स्वातंत्र्यानंतरही भोसगे ग्रामस्थ विहिरीतून शेंदून पाणी पितात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:16 AM2021-06-24T04:16:40+5:302021-06-24T04:16:40+5:30

राजकीय वारसा लाभलेल्या या गावाकडे राज्यकर्त्यांनी लक्ष दिल्यानेच ही स्थिती असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. भोसगे गावची लोकसंख्या सन-२०११ नुसार ...

Even after independence, the villagers drink water from the wells | स्वातंत्र्यानंतरही भोसगे ग्रामस्थ विहिरीतून शेंदून पाणी पितात

स्वातंत्र्यानंतरही भोसगे ग्रामस्थ विहिरीतून शेंदून पाणी पितात

Next

राजकीय वारसा लाभलेल्या या गावाकडे राज्यकर्त्यांनी लक्ष दिल्यानेच ही स्थिती असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. भोसगे गावची लोकसंख्या सन-२०११ नुसार १ हजार ४५० इतकी आहे. कुटुंबसंख्या दोनशेपेक्षा अधिक आहे. ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिरासमोर स्वातंत्र्यपूर्व काळापासून एक सार्वजनिक चिरेबंदी एक विहीर आहे. त्याची रूंदी तीस फूट तर खोली ६० फूट आहे. या सार्वजनिक विहिरीतून संपूर्ण गाव सकाळी व संध्याकाळी पाणी शेंदून नेतात. त्यामुळे अनेक महिलांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

या गावापासून दीड किलोमीटर अंतरावर कर्नाटक सीमा आहे. यामुळे या गावावर शासनाकडून सतत अन्याय झाला आहे. यामुळे म्हणावी तशी विकासकामे झाली नाहीत. त्यातच राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणाही कारणीभूत असल्याची व्यथा नागरिकांमधून व्यक्त होत आहे. अनेक गावांना शासनाचे विविध प्रकारचे पाणीपुरवठा योजना राबवून गावे पाणीटंचाई मुक्त केलेली असताना एकमेव गाव दुर्लक्षित राहिले असल्याची खंत ज्येष्ठ नागरिक कल्याणी सगर, गुरणा बिराजदार, हिराबाई सगर, भौरम्मा पाटील यांनी व्यक्त केली.

----

राजकीय वारसा लाभलेले गाव

या गावचे सुपुत्र कै. सिद्धाराम कळसगोंडा हे अडीच वर्षे पंचायत समितीचे सभापती होते. त्यानंतर पंचायत समिती सदस्य म्हणून आनंदराव सोनकांबळे कार्यरत आहेत. जुन्या काळी कै. गोविंदप्पा बिराजदार यांना तालुक्याच्या राजकारणात मानाचे स्थान होते तरीही गावचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागला नाही. या विहिरीत अनेकवेळा पावसाचे रस्त्यावरील पाणी जाते. दूषित पाण्यामुळे उलटी, जुलाब, डेंग्यूसारखे रुग्ण आढळून आलेले आहेत.

----

यापूर्वी काय झालं मला माहिती नाही. मी नुकताच सरपंच झालो आहे. आगामी काळात सर्वप्रथम सार्वजनिक पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहेत. पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी प्रश्न निकाली काढणार आहे.

- लक्ष्मीपुत्र बिराजदार, सरपंच, भोसगे.

-----

२३ अक्कलकोट-भोसगे

भोसगे गावातील सार्वजनिक चिरेबंदी विहीर दिसत आहे.

----

Web Title: Even after independence, the villagers drink water from the wells

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.