तीन महिन्यांनंतरही मोडनिंबमधील ओढे, नाले, तलाव कोरडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:27 AM2021-09-15T04:27:04+5:302021-09-15T04:27:04+5:30
मोडनिंब : जिल्ह्या अतिवृष्टी असताना मोडनिंब परिसरात पावसाने ओढ दिली आहे. परिणामत: मान्सूनचे तीन महिने उलटले तरी मोडनिंब परिसरातील ...
मोडनिंब : जिल्ह्या अतिवृष्टी असताना मोडनिंब परिसरात पावसाने ओढ दिली आहे. परिणामत: मान्सूनचे तीन महिने उलटले तरी मोडनिंब परिसरातील ओढे नाले कोरडे ठाक पडले आहेत.
पावसाळा सुरू होऊन तीन महिने उलटले. मान्सूनच्या सुरुवातीलाच जून-जुलैमध्ये खरिपाच्या पेरणी केलेल्या पिकांसाठी अल्पसा पाऊस झाला. त्यानंतर मात्र रिमझिम पाऊस पडत राहिला. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांत मोडनिंब परिसरातील एकाही ओढ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साठवणे नाही. तलाव, नाला, बंडिंग ही कोरडेच आहेत. पावसाळा संपत आला तरी मोडनिंब परिसरात पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही. या भागातील शेतकरी हतबल झाला आहे. यावर्षी उत्पादित केलेल्या कुठल्याच शेतमालाला दर नसल्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर भविष्यात पाण्याचं काय होणार? याकडे शेतकरी डोळे लावून बसला आहे. सध्या उजनी जलाशयाची शंभरीकडे वाटचाल आहे जर मोडनिंबच्या ओढ्यात उजनीचे पाणी सोडले तर भेंड, अरण, मोडनिंब, जाधववाडी, बैरागवाडी, गिड्डेवाडी भागातील शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल. मोडनिंबमधील निम्म्या विंधन विहिरींची पाणी पातळी वाढेल.
-----
१३ मोडनिंब
१३ मोडनिंब १
मोडनिंब परिसरात तीन महिन्यांपासून पावसाने ओढ दिल्याने तलाव, बंधारे कोरडे पडले आहेत.