पालकमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच सोलापुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केले चार हुतात्मा पुतळा परिसर सुभीकरणाचे भूमिपूजन

By Appasaheb.patil | Published: October 4, 2022 11:31 AM2022-10-04T11:31:19+5:302022-10-04T11:33:05+5:30

आता सोलापुरात राष्ट्रवादी-भाजप वाद पेटणार

Even before the visit of the Guardian Minister, NCP workers performed Bhoomi Puja for the beautification of Char Martyr statue area in Solapur. | पालकमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच सोलापुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केले चार हुतात्मा पुतळा परिसर सुभीकरणाचे भूमिपूजन

पालकमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच सोलापुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केले चार हुतात्मा पुतळा परिसर सुभीकरणाचे भूमिपूजन

Next

सोलापूर : नूतन पालकमंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांच्या हस्ते चार हुतात्मा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा परिसराचे सुशोभीकरण होणार होते, परंतु हा वाद आता चांगलाच पेटला आहे. माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कार्यकाळात सुशोभीकरणाच्या कामाला मंजुरी मिळाली आणि तात्कालीन पालकमंत्री भरणे यांनी एक कोटी रुपये निधी सुशोभीकरणासाठी मंजूर केला होता, परंतु सत्तांतर झाल्यानंतर आज नूतन पालकमंत्री राधाकृष्ण विखे -पाटील हे पहिल्यांदाच सोलापुरात येणार होते, आणि त्यांच्या हस्ते चार हुतात्मा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर परिसराचे सुशोभीकरण कामाचे उदघाटन करण्यात येणार होते, परंतु त्या अगोदरच राष्ट्रवादी आणि धनगर समाज सेवा मंडळाच्या वतीने उदघाटन करण्यात आले.

दरम्यान, पालकमंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांच्या दौऱ्यात हा सुशोभीकरण कामाचा शुभारंभ होणार होता, परंतु आजच्या होणाऱ्या कार्यक्रमात ज्या माजी दत्तात्रय भरणे यांनी मंजूर केला त्या कामाचे उदघाटन भाजपचे पालकमंत्री करत असून याचे सर्व श्रेय नूतन पालकमंत्री घेत आहेत. हा परिसर सुशोभीकरण व्हावा यासाठी सर्व पक्षाचे राजकीय नेते, धनगर समाज बांधव यांनी तात्कालीन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता, त्यानुसार माजी पालकमंत्री भरणे यांनी सदर कामासाठी निधी मंजूर केला होता, परंतु या कामाचे उदघाटन करण्यासाठी प्रशासनाकडून कोणतेही प्रोटोकॉल पाळले गेले नाहीत, सदर आज होणाऱ्या उदघाटन कार्यक्रम पत्रिकेत चार हुतात्म्यांच्या वारसदाराचे देखील नाव नाही. आजच्या उदघाटन कार्यक्रमाला पुरातत्व खात्याची परवानगी घेतली आहे का, याबाबत भाजप हे प्रशासनावर दबाव आणून काम करून घेत असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर आणि धनगर समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष शेखर बंगाळे यांनी केला

यावेळी दीपक राजगे, चंद्रकांत पवार, ज्योतिबा गुंड, बसू कोळी, लखन गावडे, बिरप्पा बंडगर, विपुल केसकर, अक्षय बचुटे, सोपान खांडेकर यांच्यसह राष्ट्रवादी चे कार्यकर्ते आणि धनगर समाज बांधव उपस्थित होते.

 

Web Title: Even before the visit of the Guardian Minister, NCP workers performed Bhoomi Puja for the beautification of Char Martyr statue area in Solapur.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.