कोरोनाकाळातही साडेसात हजार मातांनी दिला सोलापुरात बाळांना सुखरूप जन्म !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 02:14 PM2021-06-24T14:14:10+5:302021-06-24T14:14:17+5:30

शासकीय रुग्णालय : गरोदर महिलांची काळजी घेऊनच केली प्रसूती

Even during the Corona period, seven and a half thousand mothers gave birth to babies safely in Solapur! | कोरोनाकाळातही साडेसात हजार मातांनी दिला सोलापुरात बाळांना सुखरूप जन्म !

कोरोनाकाळातही साडेसात हजार मातांनी दिला सोलापुरात बाळांना सुखरूप जन्म !

googlenewsNext

सोलापूर : कोरोनाकाळामध्ये (मार्च २०२० ते मे २०२१) दरम्यान सात हजार ६९३ महिलांची प्रसूती झाली. कोरोनाविषयक सर्व प्रकारची काळजी घेऊन महिलांची प्रसूती करण्यात आल्याचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी सांगितले.

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जिल्ह्याच्या अनेक भागांतून प्रसूतीसाठी महिला येतात. ग्रामीण भागामध्ये प्रसूतीसाठी अडचणी आल्यास त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला देण्यात येतो, तसेच सोलापूर शहरातील महिलादेखील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात येत असतात.

कोरोना संसर्गित मातांवर उपचार करीत असताना पीपीई किट (पर्सनल प्रोटेक्टशन इक्विपमेंट) चा वापर योग्य पद्धतीने करावा लागतो. रुग्ण हाताळण्यासाठीच्या सर्व नियमांचे अतिशय काटेकोरपणे पालन करीतच स्त्रीरोग व प्रसूती विभागाच्या टीम हे काम करीत आहे. पीपीई किट, मास्क, फेस शिल्ड अशा पद्धतीने डॉक्टरांनी स्वत:च्या संरक्षणार्थ वेश परिधान करीत नव्या जीवांना या जगात आणले. प्रसूती करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑपरेशन थिएटर निर्जंतुक करण्यात येते.

चाचणी आवश्यक

गर्भातील बाळाची अवस्था काय, काही व्यंग तर नाही ना, वाढीची अवस्था, गरोदर मातेला काही आजार, तर नाही ना, याची इत्थंभूत माहिती मिळण्यासाठी रक्ताच्या विविध चाचण्या, तसेच सोनोग्राफी करणे आवश्यक आहे. शासकीय रुग्णालयात रक्त चाचणी, सोनोग्राफीची सुविधा मोफत उपलब्ध आहे. सरकारी रुग्णालयात गर्भवती महिलांनी नियमित रक्त चाचणी व सोनोग्राफी करावी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला.

३३६ कोरोना संसर्गित मातांची प्रसूती

कोरोना संसर्गित महिलेची प्रसूती करणे तसे अवघड काम आहे. स्वत:ला कोरोनाच्या विषाणूपासून वाचवीत बाळाला सुरक्षित राखण्याची महत्त्वाची जबाबदारी या डॉक्टरांवर असते. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एकूण ३३६ कोरोना संसर्गित मातांची प्रसूती करण्यात आली.

 

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये माता या प्रसूतीसाठी आल्यानंतर त्यांची सर्व प्रकारची तपासणी करण्यात येते. महिलांमध्ये कोरोनाबाबत जागरूकता असल्याने त्यांनी काळजी घेऊन सर्व प्रकारच्या चाचण्या करून घेतल्या. त्यामुळे जन्मलेल्या बाळांमध्ये कोणतेही व्यंग नव्हते. अधिष्ठातांच्या मार्गदर्शनाखाली आमची टीम महिलांच्या आरोग्याची काळजी घेत आहे.

- डॉ. विद्या तिरनकर, विभाग प्रमुख, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र, शासकीय रुग्णालय

---------

वर्ष             प्रसूती

  • २०१८ - ७५३८
  • २०१९ - ८९२६

कोरोना काळात झालेल्या प्रसूती (मार्च २०२० ते मे २०२१) - ७६९३

 

 

Web Title: Even during the Corona period, seven and a half thousand mothers gave birth to babies safely in Solapur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.