हार्वेस्ट मशीननेही ऊसतोडणी उरकेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:19 AM2020-12-23T04:19:45+5:302020-12-23T04:19:45+5:30
वाढलेली थंडी काही पिकांना पोषक मंगळवेढा : तापमापीवरील पारा हा १२.१ अंशसेल्सिअसवर पोहोचला आहे. त्यामुळे सध्या थंडीत वाढ झाली ...
वाढलेली थंडी काही पिकांना पोषक
मंगळवेढा : तापमापीवरील पारा हा १२.१ अंशसेल्सिअसवर पोहोचला आहे. त्यामुळे सध्या थंडीत वाढ झाली आहे. ही थंडी रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, कांदा या पिकांना पोषक आहे. या थंडीमुळे पिकांना पाणी न देताही केवळ थंडीवर त्यांना जीवदान मिळत असल्याचे शेतकरी सांगतात. कडाक्याच्या थंडीमुळे पहाटे होणारी शेतीतील कामे उशिराने सुरू होऊ लागली आहेत.
शाळकरी मुलांची शेतीकामात मदत
मोहोळ : सध्या सुगीचा हंगाम सुरू आहे. शेतामध्ये ज्वारीमध्ये बैलाद्वारे अंतर्गत मशागत, गव्हाची खुरपणी, हरभऱ्यावर औषधांची फवारणी ही कामे सुरू आहे. तसेच कांदा काढणी सुरू असल्याने काढणीपासून कापणी, निवड, पोत्यात भरणे ही काम सुरू आहेत. या सर्व कामांत शेतकऱ्यांना शाळकरी मुलांची मदत होत असल्याचे दिसून येत आहे. शेतात कामाला आलेल्या मजुरांना ते पाणी आणून देण्याचेह काम करीत आहेत.
वडापूर-कुसूर रस्ता दुरुस्तीची मागणी
मंद्रुप : दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर ते कुसूर हा तीन किलोमीटरचा रस्ता खूपच खराब झालेला आहे. वाळू वाहतुकीमुळे ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. वाळू टेंडर थांबल्यानंतर या रस्त्याच दुरुस्ती केली गेली नाही. सध्या त्याच रस्त्यावरून ऊस वाहतूक करणारी वाहने जातात. परंतु खड्ड्यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.