नॉन क्रिमीलेअर नसेल तरी नो टेन्शन, विद्यार्थ्यांनो हमीपत्रावर घ्या ॲडमिशन!

By संताजी शिंदे | Published: June 29, 2023 02:35 PM2023-06-29T14:35:16+5:302023-06-29T15:33:39+5:30

शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने अर्जाची पोहोच पावती व हमीपत्र घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, असे आदेश काढले आहेत.

Even if there is no non-crime layer, no tension, students take admission on guarantee! | नॉन क्रिमीलेअर नसेल तरी नो टेन्शन, विद्यार्थ्यांनो हमीपत्रावर घ्या ॲडमिशन!

नॉन क्रिमीलेअर नसेल तरी नो टेन्शन, विद्यार्थ्यांनो हमीपत्रावर घ्या ॲडमिशन!

googlenewsNext

सोलापूर : दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर सध्या प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. ११वीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी विविध दाखले काढले जात आहेत. मात्र, सर्व्हर डाऊन असल्याने पालक व विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने अर्जाची पोहोच पावती व हमीपत्र घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, असे आदेश काढले आहेत.

२ जून रोजी इयत्ता दहावीचा निकाल लागल्यानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्याकरिता पालकांची लगबग सुरू झाली. प्रवेशाकरिता जातीचा दाखला, उत्पन्न दाखला, नॉन क्रिमीलेअर, रहिवास दाखला, आदी दाखल्यांची आवश्यकता असते. पालकांनी दाखले मिळण्यासाठी महा-ई-सेवा केंद्रामार्फत ऑनलाइन अर्ज केले आहेत. शासनाच्या सर्व्हरवर अचानक लोड आल्यामुळे दाखले निघेनासे झाले आहेत. जिल्हा प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांकडून दाखल्यांवर सह्या होत आहेत, मात्र त्याची प्रिंट निघत नाही.

एकीकडे शहर व जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये २६ जुलै रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याकरिता १ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. अशा परिस्थितीमध्ये आवश्यक दाखले मिळत नसल्याने पालक व विद्यार्थ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. सर्व्हर डाऊन असल्यामुळे विद्यार्थ्यांना दाखले मिळत नाहीत अशी तक्रार शासनाच्या शालेय शिक्षण मंत्रालयाकडे गेली होती. शासनाने याची दखल घेतली असून, शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग पुणे कार्यालयाला पत्र पाठवून सूचना केल्या आहेत.

तीन महिन्यांची मुदतवाढ द्या!
विद्यार्थ्यांना उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे (नॉन क्रिमीलेअर) प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी, असेही पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे. हे पत्र शालेय शिक्षण मंत्रालयातील कक्ष अधिकारी विवेक सपकाळ यांच्या सहीने काढण्यात आले आहे.

दोन दिवसांत सर्व्हरची समस्या सुटेल : शमा पवार
संपूर्ण महाराष्ट्रातून दाखल्यांसाठी अर्ज येत आहेत, त्यामुळे अचानक सर्व्हरवर ताण आला आहे. दाखला निघण्यात अडचणी येत आहेत, मात्र यावर सध्या काम सुरू आहे. मुंबई कार्यालयाकडे याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. दोन दिवसांत सर्व्हरची समस्या सुटेल अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

Web Title: Even if there is no non-crime layer, no tension, students take admission on guarantee!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.