कोरोनाच्या काळातही ‘स्वेरी’ हाऊसफुल्लकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:26 AM2021-01-16T04:26:00+5:302021-01-16T04:26:00+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीईटी परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आल्याने इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया रखडली होती. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी अभियांत्रिकीच्या ...

Even in the time of Corona, ‘Sweery’ was moving towards Housefull | कोरोनाच्या काळातही ‘स्वेरी’ हाऊसफुल्लकडे वाटचाल

कोरोनाच्या काळातही ‘स्वेरी’ हाऊसफुल्लकडे वाटचाल

Next

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीईटी परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आल्याने इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया रखडली होती. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी अभियांत्रिकीच्या पहिल्या फेरीची ऑनलाईन प्रक्रिया सध्या सुरु आहे.

सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण १४ महाविद्यालये आहेत. त्यातील काही महाविद्यालये बाटूकडे तर काही सोलापूर विद्यापीठांतर्गत कार्यरत आहेत. प्रथम वर्ष इंजिनिअरिंगची आणखी एक फेरी राहिली असून दुसरी फेरी येत्या १८ जानेवारीपासून सुरु होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालये अद्याप सुरु नाहीत. ती लवकरच पूर्ववतपणे सुरु होण्याची शक्यता आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करीता प्रथम वर्ष इंजिनिअरिंगच्या पहिल्या प्रवेश फेरीची अलॉटमेंटमध्ये जिल्ह्यातील अधिक विद्यार्थ्यांनी स्वेरीच्या ‘पंढरपूूर पॅटर्न’ ला अधिक पसंती दिली आहे.

काही विद्यार्थ्यांना प्रथम फेरीमध्ये पसंतीच्या कॉलेजमध्ये सीट अलॉट झाले नाही. तरी त्यांनी घाबरण्याचे कारण नाही. दुसऱ्या कॅप राऊंडमध्ये सर्व जागा खुल्या होणार असल्याने सीट न मिळालेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याने प्रथम प्रवेश फेरीमध्ये मिळालेला प्रवेश ‘नॉट फ्रिझ’ करून द्वितीय प्रवेश फेरीमध्ये विचारपूर्वक ऑप्शन भरले तर त्याला आपल्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळू शकतो, असे प्रतिपादन प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉ. धनंजय चौधरी यांनी केले.

कोट ::::::::::::::::::::

बऱ्याच विद्यार्थ्यांनी दुसऱ्या कॅप राऊंडमध्ये स्वेरी अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेण्याची इच्छा व्यक्त केली. विद्यार्थी व पालकांनी यंदा देखील नेहमीप्रमाणे स्वेरीच्या शिक्षण पद्धतीवर विश्वास दर्शविला. आम्ही त्या विश्वासाला पात्र राहून विद्यार्थ्यांच्या जडणघडणीला प्रथम प्राधान्य देऊ.

- डॉ. बी. पी. रोंगे

संस्थापक सचिव व प्राचार्य

प्रथम फेरीतील जागा वाटप

स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (गोपाळपूर, पंढरपूर) : ४४६

वालचंद महाविद्यालय (सोलापूर) : ३२३

ऑर्चिड महाविद्यालय (सोलापूर) : २६१

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय (कोर्टी, ता. पंढरपूर) : २५९

एन. बी. नवले सिंहगड (केगाव) : १४६

बी.एम.आय.टी.(तिऱ्हे) : १३७

कर्मयोगी अभियांत्रिकी (शेळवे, ता. पंढरपूर) : ९५

ए. जी. पाटील (सोरेगाव) - ६७

एम.आय.टी. रेल्वे इंजिनिअरिंग (बार्शी) : ६७

बी.आय.टी. (बार्शी) - ५५

सिद्धेश्वर महिला अभियांत्रिकी (सोलापूर) : ५३

भारतरत्न इंदिरा गांधी (सोलापूर) : ४९

फॅबटेक (सांगोला) : ४४

व्ही.व्ही.पी. (सोलापूर) : ३०

Web Title: Even in the time of Corona, ‘Sweery’ was moving towards Housefull

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.