संकटातही कला जोपासत बच्चे कंपनी गुंतली छंदात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:20 AM2021-04-19T04:20:07+5:302021-04-19T04:20:07+5:30
भारतीय संस्कृतीत बालहट्ट हा श्रेष्ठ मानला जातो. सध्या शाळेच्या ओझ्यातून मुक्त झालेल्या चिमुकल्यांची भलतीच कोंडी झाली आहे. ...
भारतीय संस्कृतीत बालहट्ट हा श्रेष्ठ मानला जातो. सध्या शाळेच्या ओझ्यातून मुक्त झालेल्या चिमुकल्यांची भलतीच कोंडी झाली आहे. सध्याच्या परिस्थितीमुळे बंदिवासात अडकलेल्या चिमुकल्यांच्या सुप्त कलेला वाव मिळाला आहे. यासाठी पालकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. यातच गुरव कुटुंबातील श्लोक गुरव व शुभ्रा गुरव या भावंडांनी माठावर कोरोनाविषयी संदेश, चित्रे काढून कोरोना जनजागृती करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.
संक्रांतीला वापरले जाणारे छोटे माठ, फुटकी गाडगी वापरून त्यावर चित्रकला करतात. यावर मास्क, सॅनिटायझर, हात धुवा असे संदेश लिहिले आहेत.
जगावर आलेल्या संकटातही कला जोपासणाऱ्या निरागस बच्चे कंपनीवर मोठ्यांचे निर्बंध बंधनकारक ठरतात. तरीही या गोष्टी झुगारून आपापले छंद जोपासणारी बच्चे कंपनी सध्या दिसत आहे.
कोट ::::::::::::::::::::::
सध्या कोरोना महामारीमुळे बच्चे कंपनीसाठी स्वातंत्र्यावर बंधने आली आहेत. त्यामुळे मोबाइल, टीव्ही अशा बैठ्या प्रकारांमध्ये मुले गुंतल्याचे दिसत आहे. यासाठी पालकांनी मुलांना त्यांच्या छंदानुसार दिशा दिली तर निश्चितच मुलांसाठी भविष्यात फायदेशीर ठरणार आहे.
- विलास पुजारी, पालक
फोटो :::::::::::::::
सध्या सुरू असलेल्या सुटीत माठावर कोरोना प्रतिबंधात्मक संदेश लिहून छंद जोपासताना श्लोक व शुभ्रा गुरव.