सायंकाळच्या पावसाने अक्कलकोटला रात्रभर झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:17 AM2021-07-11T04:17:08+5:302021-07-11T04:17:08+5:30
अक्कलकोट तालुक्यात बारा दिवस पाउस गायब होता. काही गावांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. मागील दोन दिवसांत पावसाला सुरूवाता ...
अक्कलकोट तालुक्यात बारा दिवस पाउस गायब होता. काही गावांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. मागील दोन दिवसांत पावसाला सुरूवाता झाली. सायंकाळी ६ वाजता मुसळधार पावसाला सुरवात झाली. जवळपास दोन तास धो धो पाऊस बरसला. काही क्षणाच्या विश्रांतीनंतर शनिवारी पहाटे ३ वाजेपर्यंत रिमझिम पाऊस सुरू होता.
शिरसी, काळेगाव ओढ्याला पाणी आले असून बोरी नदी ५० टक्के क्षमतेने भरुन वाहत आहे. पितापूर व अक्कलकोट येथील भीमनगर, रामपूर येथील काही लोकांच्या घरात पाणी शिरले. अनेकांचे घराचे नुकसान हाऊन संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. अक्कलकोट जवळील केशर ओढा पाण्याने ओव्हरफुल झाल्याने त्या मार्गावरील जवळच्या गावांचा संपर्क तुटला होता. निमगाव, चिक्केहळळी, हत्तीकणबस, सलगर गावचे संपर्क तुटला होता. अक्कलकोट, चप्पळगाव, किणी या गात अनेक शेतातील बांध फुटून वाहवून गेले आहेत.
दोन दिवसातील पावसामुळे हत्तीतलाव शंभर टक्के भरुन वाहतो आहे. या पावसात स्मशानभूमीचे संरक्षण भिंत तुटून पडली आहे.
यावेळी भीमनगर येथे मदतीसाठी रिपाइं तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे, रोमित मडिखांबे, दिनेश रूही, प्रनेश बनसोडे, सिद्धार्थ साळे, शिवानंद मडिखांबे सिद्धाराम मडिखांबे, महादेव बनसोडे, विशाल माने, आकाश बनसोडे यांनी परिश्रम घेतले.
-----
यांच्या घरात शिरले पावसाचे पाणी
भीमनगर : सिद्धार्थ साळे, अर्जुन साळे, गायकवाड,कल्लाप्पा बनसोडे, अंबादास बनसोडे, शिलामणी बनसोडे, प्रभावती मडिखांबे, शिवशरण विशाल माने, शिवानंद मडिखांबे, सुभाष मडिखांबे, प्रदीप सर्जन.
रामपुर : लक्ष्मण कोणदे, इरणा सुतार, लक्ष्मण सुतार, नागेंद्र बिराजदार, काशिनाथ बिराजदार, काशिनाथ सुतार, सिद्धाराम कोणदे, चनम्मा वाघमारे.
पितापूर: रसूल फकीर, असलं फकीर, लिंबाजी देढे, गजानन पाटील, आमसिद्ध पांढरे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
----
शुक्रवारी झालेला पाऊस
अक्कलकोट ६० मिमी., चप्पळगाव २४, वागदरी १६, किणी २२, मैंदर्गी ०५, दूधनी १३, जेऊर १५, करजगी १२, तडवळ ८, असे एकुण १९.४४ मिलिमीटर पाऊस झाले आहे.
---
फोटो : १० हत्तीतलाव
१० पितापूर