सोलापूरातील घटना ; टॉवरमध्ये अडकून ३० पक्षी मृत्युमुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 02:40 PM2018-07-20T14:40:10+5:302018-07-20T14:42:12+5:30
पक्षीमित्रांचे धाडस : मराठी पत्रकार भवन चौकातील टॉवर खोलले
सोलापूर : वाढत्या ध्वनिप्रदूषणापाठोपाठ मोबाईल टॉवर आणि रेडियसच्या प्रश्नाने स्वरुप गंभीर केले आहे़ मोबाईल ही आजची नितांत गरज बनली असली तर यासाठी लावण्यात आलेले टॉवर हे पक्ष्यांसाठी जीवघेणे ठरत आहेत याचीच प्रचिती गुरुवारी मराठी पत्रकार भवन चौकातील रिलायन्स टॉवरमध्ये आली. या टॉवरच्या बेसमेंटमध्ये अडकून चक्क ३० साळुंखी पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे़
हा प्रकार सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास वन्यजीवप्रेमी सदस्य शिवानंद आलुरे आणि मुकुंद शेटे या दोघांनी समोर आणला आहे़ या टॉवरमध्ये काही पक्षी अडकल्याचे आलुरे आणि शेटे यांना कळाले होते़ त्यांनी या टॉवरजवळ जाऊन पाहणी केली, परंतु अंधार असल्याने त्यांना काही करता आले नाही़
त्यानंतर दुसºया दिवशी त्यांनी रिलायन्स कंपनी आणि वनविभागाशी संपर्क साधून टॉवरचा दरवाजा खोलण्याची विनंती केली़ मात्र चौकशीत त्यांना हे टॉवर महापालिकेने सील केल्याचे निदर्शनास आले़ मनपाचे संबंधित अधिकारी भारत शिंदे यांच्याशी संपर्क साधला़ त्यांनी टॉवरचा दरवाजा खोलण्याची परवानगी मिळवली आणि त्यांनी रिलायन्स कंपनीच्या दोन टेक्निशयन आणि त्या दोन प्राणिमित्रांना समोर घेऊन अखेर टॉवर खोलले़ आत डोकावले असता टॉवर वरुन खुले दिसले़ या खुल्या टॉवरमधून बिळात पक्षी घरटी करायला गेले आणि ते पुन्हा वर आलेच नाहीत़ याही स्थितीत एक साळुंखी जिवंत अवस्थेत वर येण्यासाठी धडपडताना निदर्शनास आली़ तिचा जीव वाचला मात्र टॉवर ६० फूट उंचीवर असल्याने ३० साळुंखी पक्ष्यांना वर उडता आले नाही आणि ते मृतावस्थेत आढळून आले़
वनविभागाने रिलायन्सच्या अधिकाºयांना बोलावले
च्हा गंभीर प्रकार पाहता वनविभागाचे अधिकारी निकेतन जाधव यांनी रिलायन्सच्या अधिकाºयांना शुक्रवारी कार्यालयात बोलावले आहे़ या प्रकाराची माहिती त्यांनी त्यांच्याकडे मागितली आहे़ यानंतर काय कारवाई होणार याकडे प्राणिमित्रांचे लक्ष लागून आहे़
टॉवरवर टोपी बसवायची परवानगी मागितली
च्सोलापूर शहरात रिलायन्सने अनेक टॉवर उभारले आहेत़ या टॉवरच्या वादविवादात महापालिकेने पत्रकार भवन चौकातील हे टॉवर सील केले आहे़ नेमके या टॉवरवर टोपी घातलेली नव्हती़ ती घालण्यासाठी गुरुवारी रिलायन्सच्या अधिकाºयांनी नगरअभियंता संदीप कारंजे यांच्याकडे परवानगी मागितली आहे़