Maharashtra Election 2019; अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचा शहर उत्तरचा उमेदवार ठरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 11:43 AM2019-10-04T11:43:51+5:302019-10-04T11:46:27+5:30

मनोहर सपाटे भरणार उमेदवारी: आज सकाळीच मिळाला ए/ बी फॉर्म

Eventually, the city of NCP became the candidate of the North | Maharashtra Election 2019; अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचा शहर उत्तरचा उमेदवार ठरला

Maharashtra Election 2019; अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचा शहर उत्तरचा उमेदवार ठरला

Next
ठळक मुद्देकाँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत शहर उत्तरची जागा प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आलीभाजपा—सेना युतीत असंतुष्ट राहिलेले कोण हाती लागते काय याची चाचणी पदाधिकाºयांकडून सुरू होतीविशेष म्हणजे सन २0१४ च्या निवडणुकीत सपाटे यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती

सोलापूर : अखेर सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार शुक्रवारी सकाळी फायनल झाला. राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष भारत जाधव व कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी आत्ताच माजी महापौर मनोहर सपाटे यांना पक्षाचा ए/बी फॉर्म दिला. 

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत शहर उत्तरची जागा प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली आहे. पण या जागेवर उमेदवार ठरत नव्हता. सपाटे यांनी शहर उत्तरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याबाबत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. ही जागा सुटल्यावर मात्र सुरूवातीला त्यांनी निवडणूक लढविण्यास अडचण सांगितली. त्यामुळे पक्षापुढे पेच निर्माण झाला होता.

भाजपा—सेना युतीत असंतुष्ट राहिलेले कोण हाती लागते काय याची चाचणी पदाधिकाºयांकडून सुरू होती. पण आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने व नवीन उमेदवार हाती न लागल्याने पक्षाकडून आलेला ए/बी फॉर्म सपाटे यांना देण्यात आला. त्यामुळे शहर उत्तरसाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात अखेर उमेदवार ठरला आहे. विशेष म्हणजे सन २0१४ च्या निवडणुकीत सपाटे यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती. आता ते पक्षातर्फे निवडणूक रिंगणात उतरत आहेत. 

Web Title: Eventually, the city of NCP became the candidate of the North

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.