दंड बजावूनही न ऐकल्याने अखेर कापड दुकान सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:21 AM2021-04-18T04:21:56+5:302021-04-18T04:21:56+5:30
कोरोनाचे वाढती रुग्णसंख्या पाहता शासनाने संचारबंदी जाहीर केली. या कालावधीत सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले. तरीही मसुती रेडिमेड ...
कोरोनाचे वाढती रुग्णसंख्या पाहता शासनाने संचारबंदी जाहीर केली. या कालावधीत सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले. तरीही मसुती रेडिमेड कापड दुकान शोरूम बाहेरून बंद तर आतून सुरू ठेवले होते. याबाबत पोलीस प्रशासनाकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी अनेक वेळा तोंडी सांगितले. तरीही ऐकत नसल्याने अखेर शोरूमला सील ठोकावे लागले. ही कारवाई १७ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता पोलीस व नगरपालिका प्रशासन यांनी संयुक्तपणे केली.
ही कारवाई उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. एस. पुजारी, सहा. पाेलीस निरीक्षक भावीकट्टी, पोलीस काॅन्स्टेबल अंबादास कोल्हे, गजानन शिंदे, अंबादास दूधभाते, गोपनीय विभागाचे धनराज शिंदे, नगरपालिकेचे कार्यालयीन प्रमुख मलिक बागवान, कर्मचारी महादेव चव्हाण, फिरोज शेख, सुभाष सोनकांबळे यांनी केली.
कोट
या व्यापाऱ्याला प्रशासनाने अनेक वेळा ताकीद देऊनही ऐकले नाही. दरम्यान किरकोळ दंडात्मक कारवाई केली आहे. तरीही सुरूच ठेवल्याने अखेर दुकानाला सील ठोकावे लागले. लॉकडाऊन संपेपर्यंत हे सील असेल. सील काढतानासुद्धा दंडात्मक कारवाई होणार आहे. यापुढे व्यापाऱ्यांनी दुकाने उघडल्याचे आढळून आल्यास अशाच प्रकारची कारवाई करण्यात येईल.
- मलिक बागवान, कार्यालयीन प्रमुख, नगरपालिका
फोटो
१७अक्कलकोट-कारवाई
ओळी
अक्कलकोट शहरातील ए वन चौकातील मसुती कापड दुकानाला प्रशासनाने सील ठोकले आहे.