पंढरपूरात उत्पातांनी उभारले प्रति रुक्मिणी मंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 01:21 PM2018-10-08T13:21:45+5:302018-10-08T13:22:32+5:30
पंढरपूर : चार वर्षांपूर्वी पंढरीची श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पूर्णपणे शासनाने ताब्यात घेतले आहे. यानंतर मंदिरातील बडवे-उत्पात व सेवाधारी यांना बाहेर काढून त्यांच्या जागी पगारावर पुजाºयांची नियुक्ती करण्यात आली होती. यामुळे उत्पातांनी प्रति रुक्मिणी मंदिर उभारले असून त्या मंदिरात रुक्मिणी मातेच्या मूतीर्ची प्रतिष्ठापना ११ आॅक्टोबर (गुरुवारी) होणार आहे.
मंदिरातून बाहेर काढल्यानंतर अनेक वर्षापासून बडवे व उत्पात समाजाच्या मंदिरातील परंपरा करण्यास मनाई करण्यात आली होती. तसेच मंदिर समितीकडून स्थानिकांना देवाला नैवेद्य दाखवण्यात देखील रोखले जाते जाते. तसेच काही जुन्या परंपरा खंडित करण्यात आले आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करून समस्त उत्पात समाजाच्या वतीने काळा मारुती नजीक वसिष्ठ आश्रम येथे रुक्मिणी मातेचे मंदिर उभारले आहे.
येथील मूतीर्ची प्रतिष्ठापना नवरात्र मध्ये गुरुवारी अकरा रोजी करण्यात येणार आहे. या रुक्मिणी मंदिरात पूर्वीप्रमाणेच मंदिरातील सर्व नित्योपचार बाराही महिने सुरू करण्यात येणार आहेत. काकडा आरती नैवेद्य पोशाख धूपारती शेजारती याप्रमाणे राजोपचार पार पडणार आहे. मंदिरातील सर्व परंपरा पुन्हा सुरू करून त्याचे जतन व संवर्धन करण्यात येणार आहे.