प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून ज्ञानदान करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:39 AM2021-02-06T04:39:27+5:302021-02-06T04:39:27+5:30
शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त संस्थेतील सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ...
शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त संस्थेतील सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
डॉ. बी. वाय. यादव म्हणाले, कर्मवीर मामांनी जो आदर्श घालून दिला आहे, त्यावरून आम्ही मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. त्या हेतूने आम्ही ट्रॉमा युनिटची उभारणी करत आहोत. यासाठी संस्थेच्या कर्मचाऱ्यांनीे एक महिन्याचा पगार दिला. विश्वस्त राजेंद्र पवार यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख जयकुमार शितोळे, सहसचिव पी. टी. पाटील, खजिनदार दिलीप रेवडकर, प्रा. डॉ. संजय करंडे, प्रा. डॉ. व्ही. पी. शिखरे उपस्थित होते.
या सेवानिवृत्तांचा झाला सन्मान
प्राचार्या डॉ. एस. एन. मोळवणे, उपप्राचार्य व्ही. जे. देशमुख, मुख्याध्यापक राजेंद्र गायकवाड, मुख्याध्यापिका उल्का धावारे, मुख्याध्यापक देवेंद्र पाटील, प्राध्यापक दीपक बेंद्रे, भारत गुंड, पर्यवेक्षक विष्णुदास लिमकर, सहशिक्षक राजेंद्र जाधव, विठ्ठल देवक, किसनराव माने, बी. बी. गंजे, वरिष्ठ लिपिक तानाजी मोरे, नवनाथ कुऱ्हाडे, इरफान इनामदार, कनिष्ठ लिपिक रमेश जगदाळे, पी. डी. कसबे, प्रयोगशाळा सहायक आनंद देशमुख, टी. के. सपकाळ, नवनाथ कुऱ्हाडे, बी. के. तलवारे, महादेव नाईक, देविदास कदम, छाया राऊत, छाया माने, शकुंतला यादव, राधा कांबळे या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
कर्मवीर प्रज्ञाशोध परीक्षेतील ५वी ते १२वीतील विविध गटातील संस्कार ढेकणे, किमया बुरंडे, शिवानी भांडवलकर, श्रेया सावंत, अक्षय सावंत, प्रज्वल देशमुख, रूपाली होनखांबे, स्नेहा सातपुते, पंकज लांडगे, सुप्रिया माने, सांज तांबोळी, पूजा चौधरी या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
फोटो
०४बार्शी सत्कार
ओळी
शिवाजी शिक्षण मंडळातील सेवानिवृत्तांच्या सत्कारप्रसंगी सीईओ दिलीप स्वामी, डॉ. बी. वाय. यादव, राजेंद्र पवार व अन्य.