‘एनआरसी’साठी गरिबाने कुठून आणायचे पुरावे ? मौलाना मदनींचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 12:10 PM2020-01-20T12:10:08+5:302020-01-20T12:13:18+5:30

‘सीएए’मुळे भारतीय संविधानाला धक्का;  देशात फूट पाडू नका, कायदा मागे घ्या !

Evidence From The Poor For 'NRC'? The question of Maulana Madani | ‘एनआरसी’साठी गरिबाने कुठून आणायचे पुरावे ? मौलाना मदनींचा सवाल

‘एनआरसी’साठी गरिबाने कुठून आणायचे पुरावे ? मौलाना मदनींचा सवाल

Next
ठळक मुद्देनागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या निषेधार्थ जमिअत उलेमा - ए - हिंदतर्फे सोलापुरातील पानगल हायस्कूलच्या मैदानावर संविधान बचाव संमेलनमौलाना महमूद असद मदनी यांनी भारतीय संविधानाला धक्का पोहोचविणारा ‘सीएए’ हा कायदा मागे घेण्याचे आवाहन केले

सोलापूर : सरकार एनआरसी (नॅशनल रजिस्टर आॅफ सिटीझन्स) आणि सीएए (सिटीझनशिप अमेंडमेंट अ‍ॅक्ट) कायद्याची अंमलबजावणी करत आहे. या कायद्यांचा विपरित परिणाम केवळ मुस्लिमांवर होणार नाही; तर अन्य समाजातील गरिबांवरही होणार आहे, असे स्पष्ट करून जमिअत उलेमा-ए-हिंदचे सचिव मौलाना महमूद असद मदनी यांनी भारतीय संविधानाला धक्का पोहोचविणारा ‘सीएए’ हा कायदा मागे घेण्याचे आवाहन केले. यावेळी तसा ठरावही पारीत करण्यात आला.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या निषेधार्थ जमिअत उलेमा - ए - हिंदतर्फे सोलापुरातील पानगल हायस्कूलच्या मैदानावर संविधान बचाव संमेलन आयोजित  करण्यात आले होते. या कार्यक्रमात मौलाना महमूद असद मदनी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर  मौलाना आझाद विचार मंचचे अध्यक्ष तथा खासदार हुसेन दलवाई, हाफिज नदीम सिद्दिकी, अजमेर शरीफ दर्गाहचे विश्वस्त सय्यद मुईन मियाँ, अहले हदीस जमियतचे मौलाना असलम जामई, बौद्ध महासभेचे भंते बी. सारिपुत्त, संविधान बचाव समितीचे समन्वयक रंगा राचुरे, नगरसेवक आनंद चंदनशिवे, पीपल्स रिपब्लिकनचे राजाभाऊ इंगळे, रिपाइं सुबोध वाघमोडे, शाम कदम, कीर्तीपाल गायकवाड, यशवंत फडतरे आदी उपस्थित होते.

मौलाना महमूद असद मदनी म्हणाले, सच्चर कमिटीच्या अहवालानुसार भारतात सर्वात गरीब हे मुस्लीम आहेत. त्यांच्यावर याचा परिणाम होणार आहे. यासोबतच आदिवासी, भटके, मागासवर्गीय यांच्यावरही याचा परिणाम होणार आहे. त्यांच्याकडे पुरावे नाहीत. भारताचा स्वातंत्र्याचा इतिहास पाहिला तर हा देश स्वतंत्र होण्यासाठी मुस्लिमांनी आपले रक्त सांडले आहे. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी मुस्लीम पुढे होता. स्वातंत्र्य टिकवायचे असल्यास मुस्लीम पुढेच राहणार आहे. खूप मोठ्या बलिदानानंतर हा देश स्वतंत्र झाला आहे. तुम्हाला निवडणूक जिंकायची असेल तर जिंका, पण फक्त निवडणुुका जिंकण्यासाठी देशात फूट पाडण्याचे काम करू नका, असेही आवाहन मौलाना मदनी यांनी केले.

नदीम सिद्दीकी म्हणाले, या कायद्याच्या बाजूने काढलेल्या रॅलीमध्ये खूप कमी लोक होते. जे या रॅलीमध्ये सामील झाले नाहीत, असे लोक आपल्यासोबत आहेत. त्यांना सोबत घेऊन या कायद्याच्या विरोधात आपल्याला संवैधानिक मार्गाने विरोध करायचा आहे. ज्या संस्था, संघटना किंवा पक्ष या कायद्याला विरोध करतील त्यांच्यासोबत आपण राहायला हवे.

खासदार हुसेन दलवाई म्हणाले, महात्मा गांधी यांनी ज्या अहिंसेच्या पद्धतीने ब्रिटिशांना विरोध केला, त्याच पद्धतीने आपल्याला विरोध करायचा आहे. या अहिंसेच्या मार्गाला ब्रिटिश घाबरले तसेच हे सरकारदेखील घाबरेल. संविधानाला हात घालाल तर ही जनता तुम्हाला बेदखल करेल.

या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात लोक आले होते. पानगल शाळेचे मैदान भरल्यामुळे शाळेच्या इमारतीतील व्हरांड्यामध्ये लोक उभे होते. पानगल शाळेच्या समोरील रस्त्यावर लावलेल्या एलईडी स्क्रीनवर कार्यक्रम दाखवत असल्यामुळे हा रस्ता देखील गर्दीने भरला होता. उपस्थितांनी हात उंचावून आपल्या मोबाईलचे टॉर्च दाखवत कार्यक्रमातील ठरावाला समर्थन दर्शविले. कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकविण्यात आला़ कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

ठराव आणि विविध आंदोलनाला पाठिंबा

  • - संवैधानिक पद्धतीने सीएए कायद्याचा विरोध करावा
  • - संविधानाला धक्का लावणारा सीएए कायदा मागे घ्यावा
  • - एनआरसीकडे जाणाºया एनपीआरला आमचा विरोध
  • - हा कायदा लागू न करण्याचा निर्णय घेतलेल्या महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन
  • - देशातील सर्व राज्य सरकारने केरळप्रमाणे हा कायदा लागू न करण्याचा ठराव करावा
  • - २४ जानेवारीला अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा द्या
  • - २९ जानेवारीला बामसेफचे वामन मेश्राम यांनी पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा द्या
  • - ३० जानेवारी रोजी होणाºया मानवी साखळीत सहभाग नोंदवावा

Web Title: Evidence From The Poor For 'NRC'? The question of Maulana Madani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.