कार्यकर्त्यांची घडी विस्कटू देऊ नका, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचे आवाहन, स्व़ ब्रम्हदेवदादा माने यांना सोलापूरात अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 03:48 PM2018-02-16T15:48:24+5:302018-02-16T15:53:49+5:30
राजकारणात राग गिळला पाहिजे, ब्रह्मदेवदादांनी तत्त्व जोपासण्यासाठी नातेवाईकांची पर्वा केली नाही, दादांनी मांडलेला विचार पुढे घेऊन जाण्यासाठी एकत्रित कार्यकर्त्यांची घडी विस्कटू देऊ नका, असे आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १६ : राजकारणात राग गिळला पाहिजे, ब्रह्मदेवदादांनी तत्त्व जोपासण्यासाठी नातेवाईकांची पर्वा केली नाही, दादांनी मांडलेला विचार पुढे घेऊन जाण्यासाठी एकत्रित कार्यकर्त्यांची घडी विस्कटू देऊ नका, असे आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.
स्व. ब्रह्मदेवदादा माने यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते. बेलाटी-तिºहे येथील ब्रह्मदेवदादा माने इन्स्टिट्यूटच्या प्रांगणात प्रथम दादांच्या पुतळ्याला प्रमुखांनी अभिवादन केले. राजकारणासोबत शिक्षणाचे केंद्र असणाºया ब्रह्मदेवदादांनी बँक, व्याख्यानमाला सुरू केली. राजकारणात चाणाक्षपणा हवा असतो अन् तो दिलीपरावांकडे असल्याचे शिंदे म्हणाले. बळीराम साठे यांनी भाषणात एकत्रित राजकारण करण्याच्या मांडलेल्या विचाराचा धागा पकडून एकमेकांची तोंडे न बघणारे दक्षिण तालुक्यातील नेतेही एकत्रित आल्याचा उल्लेख शिंदे यांनी केला. जिल्ह्यात गट तटाचे राजकारण १९८० मध्ये सुरू झाले. तालुक्यात राजकारण कधी बळीराम साठे, कधी ब्रह्मदेवदादा तर कधी गंगाराम घोडके सरकारसोबत काम केल्याचे शिंदे यांनी सांगितले. कष्टकºयांसाठी लढणाºया ब्रह्मदेवदादांनी बँक, शिक्षण संस्था उभारली, दिलीपरावांनी त्यात भरच टाकली असे आ. सिद्धाराम म्हेत्रे यांनी यावेळी सांगितले. परिणामाची पर्वा न करता घेतलेल्या निर्णयाशी दादा पक्के असायचे असेही आ. म्हेत्रे म्हणाले. सत्तेला नमस्कार करणारे अनेक राजकारणात आहेत, सत्ता नसताना आज माझ्यासोबत आहात, दादांसोबतही होता, असे भावूकपणे माजी आ. दिलीप माने यांनी सांगितले. पृथ्वीराज माने यांनी दादांनी उभारलेला समाज परिवर्तनाचा लढा पुढे सुरू ठेवू या, असे यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, शहराध्यक्ष प्रकाश वाले, आ. प्रणिती शिंदे, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या उज्ज्वलाताई शिंदे, प्रकाश यलगुलवार, विश्वनाथ चाकोते, जयश्री माने, माजी महापौर अलका राठोड, सुशीला आबुटे, जयकुमार माने, धनंजय भोसले, शैलजा राठोड, राजेंद्र सुपाते, प्रवीण डोंगरे, अविनाश मार्तंडे, जितेंद्र साठे, सुनील काटकर, शिवलिंग पाटील, चेतन नरोटे, सुरेश हसापुरे, बाळासाहेब शेळके, राजशेखर शिवदारे, गोपाळ कोरे, गुरुनाथ म्हेत्रे, बाबासाहेब पाटील, भारत जाधव, विनोद भोसले, महादेव चाकोते, दिलीप कोल्हे उपस्थित होते.
-------------------------
दिलीपरावांमुळे एकजूट
च्जि. प. चे विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांनी दिलीपराव यांनी आता स्वभावात बदल करण्याची गरज भाषणात बोलून दाखवली होती. हा धागा पकडून सुशीलकुमार शिंदे यांनी ‘काका, आता दिलीपराव फारच बदलले आहेत. म्हणूनच दक्षिण तालुक्यातील सर्वच मंडळी या व्यासपीठावर दिसत असल्याचे सांगितले.