दीड तासात होणार परीक्षा; एकदा सोडवलेला प्रश्न पुन्हा सोडवता येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 02:17 PM2020-09-11T14:17:09+5:302020-09-11T14:18:41+5:30

अंतिम वर्ष परीक्षेबाबत सूचना जाहीर : दीड तासात होणार परीक्षा

The exam will be held in an hour and a half; Once solved, the problem cannot be solved again | दीड तासात होणार परीक्षा; एकदा सोडवलेला प्रश्न पुन्हा सोडवता येणार नाही

दीड तासात होणार परीक्षा; एकदा सोडवलेला प्रश्न पुन्हा सोडवता येणार नाही

Next
ठळक मुद्देकोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना घरबसल्या आॅनलाईन परीक्षा देता येणार मोबाईल अँड्रॉईड फोनच्या माध्यमातून ही परीक्षा देता येईलज्या विद्यार्थ्यांना आॅनलाईन परीक्षा देणे शक्य नाही, अशांसाठी आॅफलाईनची व्यवस्था असेल

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. यात अभ्यासक्रमानुसार व्यावसायिक आणि पारंपरिक हे दोन भाग आहेत. दोन्ही परीक्षांचे स्वरूप वेगवेगळे असून व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिकेत एका प्रश्नानंतर दुसरा प्रश्न, तर पारंपरिक अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिकेत एका शीट नंतर दुसरी शीट विद्यार्थ्यांना दिसेल. पहिल्या शीटमधील प्रश्न सोडवल्यानंतर दुसºया शीटमधील प्रश्न सोडवता येईल. सोडवलेला प्रश्न अथवा शीट परत ओपन होणार नाही.

विद्यापीठाच्या सूचनेनुसार अंतिम वर्ष परीक्षा, एटीकेटी, बॅकलॉग विद्यार्थ्यांची परीक्षा, परीक्षा कालावधी ५ ते २९ आॅक्टोबर दरम्यान होणार आहे. दोन्ही प्रकारच्या परीक्षांमध्ये एटीकेटी, बॅकलॉग विद्यार्थ्यांसाठी ३५ प्रश्न व नियमित विद्यार्थ्यांसाठी ५० प्रश्न सोडवायचे आहेत. दोन्ही परीक्षांचा कालावधी १ तास ३० मिनिटे असला तरी तांत्रिक अडचणींची शक्यता लक्षात घेता परीक्षा लिंक पाच तासांसाठी खुली राहणार आहे; मात्र एक पेपरचा कालावधी १ तास ३० मिनिटे इतकाच राहणार आहे.

आॅनलाईन परीक्षेत विद्यार्थ्यांना बहुपर्यायी प्रश्न विचारले जाणार आहेत. अगदी सोप्या पद्धतीने परीक्षा पद्धत राहणार आहे. परीक्षा देऊन मिळालेल्या डिग्रीचा भविष्यात विद्यार्थ्यांना फायदाच होणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी आॅनलाईन परीक्षा द्यावी, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
---------------
अँड्रॉईड मोबाईलवर देता येणार परीक्षा
कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना घरबसल्या आॅनलाईन परीक्षा देता येणार आहे. मोबाईल अँड्रॉईड फोनच्या माध्यमातून ही परीक्षा देता येईल. ज्या विद्यार्थ्यांना आॅनलाईन परीक्षा देणे शक्य नाही, अशांसाठी आॅफलाईनची व्यवस्था असेल. त्यांनाही दीड तासातच परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यांच्यासाठीही प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आॅनलाईन प्रमाणेच राहणार आहे.

Web Title: The exam will be held in an hour and a half; Once solved, the problem cannot be solved again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.