मोहोळमध्ये हृदयरोग शिबिरात १५० जणांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:24 AM2021-03-09T04:24:43+5:302021-03-09T04:24:43+5:30
जनऔषधी केंद्रातर्फे १ मार्च ते ७ मार्चदरम्यान जनऔषधी सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी शिवाजीराव पवार, डॉ. नितीन भोगे ...
जनऔषधी केंद्रातर्फे १ मार्च ते ७ मार्चदरम्यान जनऔषधी सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी शिवाजीराव पवार, डॉ. नितीन भोगे मार्गदर्शन केले. तसेच जनऔषधी आणि जेनेरिक औषधी या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली.
यावेळी उपनगराध्यक्ष प्रमोद डोके, नगरसेवक मुश्ताक शेख, संयोजक सचिन शास्त्री, संजय क्षीरसागर, नगरसेवक सुशील क्षीरसागर, सागर लेंगरे, ॲड. अमित कुलकर्णी, संतोष शेंडे, विठ्ठल सुपेकर, वैजीनाथ राजमाने, रत्नाकर नाईकनवरे उपस्थित होते.
महिलांचा गौरव
डॉ. स्मिता पाटील (वैद्यकीय), जयश्री साठे (शैक्षणिक), ज्योती अष्टुळ (परिचारिका) शुभांगी लंबे (शैक्षणिक), अलकनंदा कुलकर्णी (कलासंगीत), फार्मासिस्ट स्वाती भालेराव (कोविड योद्धा), कीर्ती आंडगे (कोविड योद्धा), सुजाता शहा (शैक्षणिक) यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
फोटो
०८मोहोळ-महिला गौरव
मोहोळ येथील जनऔषधी केंद्रातर्फे विविध क्षेत्रांतील महिलांचा गौरव करण्यात आला.