ब्लेजर च्या परीक्षेत सोलापुरातील मजरेवाडी शाळेचे शिक्षक पास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 10:58 AM2018-11-19T10:58:14+5:302018-11-19T11:00:03+5:30
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाने प्राथमिक शाळेतील शिक्षकांना ड्रेस कोड व ब्लेजर ची अंमलबजावणी आजपासून सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर ...
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाने प्राथमिक शाळेतील शिक्षकांना ड्रेस कोड व ब्लेजर ची अंमलबजावणी आजपासून सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ राजेंद्र भारूड यांनी मजरेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला अचानक भेट देऊन तपासणी केली असता सर्व शिक्षक ब्लेझर वर आढळले़.
झेडपीच्या सर्वसाधारण सभेने शाळांची गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांना ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतला होता या निर्णयानंतर झेडपीचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा केली असता स्थानिक ड्रेसकोड बरोबर ब्लेझर ची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता,
परंतु नंतर शिक्षक संघटनांनी विरोध केला होता़ याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी शिक्षक संघटनांनी केली परंतु झेडपी प्रशासनाने सभेने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत स्थानिक ड्रेस कोड व ब्लेझर ची अंमलबजावणी होईल असे जाहीर केले आहे याची अंमलबजावणी आज म्हणजे सोमवार दिनांक १९ नोव्हेंबर पासून होत आहे जे शिक्षक ब्लेजर वर येणार नाहीत त्यांच्या सेवा पुस्तिकेच्यावर लाल शेरा मारला जाणार आहे तर विरोध करणा?्या संघटनांच्या प्रतिनिधींची डीई भरली जाणार आहे, याची सर्व जिल्ह्यातील २८०० शाळांमधून तपासणी होत आहे त्यामध्ये स्वत: भारुड यांनी पहिल्यांदा मजरेवाडी येथील शाळेला भेट दिली आहे पुढील शाळांच्या तपासणीसाठी दक्षिण सोलापुरात ते रवाना झाले आहेत़