मुख्यमंत्री वैदकीय सहाय्यता कक्षाची उत्कृष्ट कामगिरी; १० महिन्यात ६० कोटी ४८ लाखांची मदत

By Appasaheb.patil | Published: May 5, 2023 03:08 PM2023-05-05T15:08:38+5:302023-05-05T15:09:10+5:30

सीएम फंडातून पैसे मिळाले, आमच्या मुलाचं ऑपरेशन झालं

Excellent performance of Maharashtra Chief Minister's Medical Support Unit; 60 crore 48 lakh assistance in 10 months | मुख्यमंत्री वैदकीय सहाय्यता कक्षाची उत्कृष्ट कामगिरी; १० महिन्यात ६० कोटी ४८ लाखांची मदत

मुख्यमंत्री वैदकीय सहाय्यता कक्षाची उत्कृष्ट कामगिरी; १० महिन्यात ६० कोटी ४८ लाखांची मदत

googlenewsNext

सोलापूर : राज्यातील एकही सर्वसामान्य - गोरगरीब गरजू रुग्ण पैशाअभावी उपचाराविना राहणार नाही याची काळजी राज्य सरकार घेत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या दहा महिन्यांत कक्षाकडून ८१९२ रुग्णांना एकूण ६० कोटी ४८ लाख रुपयांची मदत दिली आहे. या मदतीमुळे गोरगरीब रूग्णांच्या नातेवाईकांना मोठी मदत झाल्याने अनेक महागड्या शस्त्रक्रिया (ऑपरेशन) मोफत झाल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, पहिल्याच जुलै महिन्यात १९४ रुग्णांना ८३ लाखांची मदत देण्यात आली. नंतर ऑगस्ट महिन्यात २७६ रुग्णांना १ कोटी ४० लाख, सप्टेंबर महिन्यात ३३६ रुग्णांना १ कोटी ९३ लाख, ऑक्टोबर महिन्यात २५६ रुग्णांना २ कोटी २१ लाख, नोव्हेंबर महिन्यात ५२७ रुग्णांना ४ कोटी ५० लाख, डिसेंबर महिन्यात १०३१ रुग्णांना ८ कोटी ५२ लाख, जानेवारी २०२३ मध्ये १०६० रुग्णांना ८ कोटी ८९ लाख तर फेब्रुवारी २०२३ मध्ये १२३७ रुग्णांना १० कोटी २७ लाख, मार्च २०२३ मध्ये १४६९ रुग्णांना ११ कोटी ९५ लाख तर एप्रिल मध्ये विक्रमी १९८४ रुग्णांना ९ कोटी ९३ लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.

Web Title: Excellent performance of Maharashtra Chief Minister's Medical Support Unit; 60 crore 48 lakh assistance in 10 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.