अतिवृष्टी नुकसानभरपाई मिळेना.. बळीराजाचा कृषी कार्यालयासमोर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:23 AM2021-01-03T04:23:24+5:302021-01-03T04:23:24+5:30
या आंदोलनामध्ये प्रवीण क्षीरसागर, आनंद यादव, शेतकरी संघटनेचे हनुमंत भोसले, महेश मोटे, इंदुमती बोकेफोडे, ऋषिकेश भोसले, सतीश शिंदे ...
या आंदोलनामध्ये प्रवीण क्षीरसागर, आनंद यादव, शेतकरी संघटनेचे हनुमंत भोसले, महेश मोटे, इंदुमती बोकेफोडे, ऋषिकेश भोसले, सतीश शिंदे यांच्यासह शंभर ते दीडशे शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी शहाजी कदम, कृषी सहायक गणेश पाटील, भारती अक्सा कंपनीच्या प्रतिनिधीस शेतकऱ्यांच्या मागणीचे निवेदन दिले.
या निवेदनात तालुक्यातील अनेक गावातील शेतकरी खरीप पिकांच्या नुकसानभरपाईपासून वंचित असल्याचे म्हटले आहे. तसेच अतिवृष्टीनंतर ७२ तासात ऑनलाईन किंवा ऑफलाईन नुकसानीची माहिती द्यावी असे विमा कंपनीने म्हटले आहे. मात्र अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक गावातील रस्ते वाहून गेले, विद्युत पुरवठा खंडित झाला त्यामुळे मोबाइल व दूरध्वनीवरून संपर्क साधणे अशक्य होते त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत नुकसानभरपाईचे अर्ज करता आले नाहीत. कंपनीचे विमा प्रतिनिधी अनेक गावात आलेच नाहीत. शेतकऱ्यांनी अनेकवेळा अर्ज देऊन ही पोच देण्यास नकार दिला.
----भरपाई देण्याची प्रक्रिया सुरु....
यावेळी तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने गणेश पाटील यांनी नुकसानीचे सर्वेक्षण करून आजपर्यंत २६,५०० शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली आहे. उर्वरित ३,५०० शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे. २८ डिसेंबरपासून कृषी कार्यालयाच्या कामकाजाच्या वेळेमध्ये भारती अक्सा कंपनीचे विमा प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन आणि तक्रारीचे निवारण करण्यासाठी उपलब्ध राहणार आहेत. नुकसानभरपाईबाबत शेतकऱ्यांनी कंपनी प्रतिनिधींशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
----
-----