शाळा पाडण्याच्या पत्रामुळे खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:23 AM2021-01-03T04:23:13+5:302021-01-03T04:23:13+5:30
राष्ट्रीय महामार्गात बाधित होत असलेल्या धर्मपुरी गावातील दोन्ही शाळांचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. या बाबतीत लोकप्रतिनिधी व ...
राष्ट्रीय महामार्गात बाधित होत असलेल्या धर्मपुरी गावातील दोन्ही शाळांचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. या बाबतीत लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या अनेक बैठका निष्फळ ठरत आहेत. शाळेसाठी बांधकाम, जागा याबाबतीत मूल्यांकनात तफावत अशा अनेक गोष्टींमुळे जिल्हा परिषदेच्या दोन्ही शाळांची स्थिती किचकट होत चालली आहे. प्रशासनाने शाळा सुरू होण्याचे संकेत दिल्यामुळे विद्यार्थी नेमके शाळेत बसणार कुठे? त्यामुळे पर्यायी व्यवस्था करूनच शाळा पाडावी, असा ग्रामस्थांचा आग्रह होता. मात्र सध्या यातील एक शाळा पाडण्यासाठी पत्र आल्यामुळे ग्रामस्थांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
कोट :::::::::::::::::::::::
जाधववस्ती शाळेची इमारत व जागेचा निधी झेडपी प्रशासनाकडे वर्ग झाला आहे. मात्र शाळेची जागा व बांधकाम याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे हा प्रश्न सुटेपर्यंत शाळा पाडली जाऊ नये, असा आमचा आग्रह आहे. यासाठी पत्रव्यवहार झाल्यामुळे ग्रामस्थांना आंदोलनाशिवाय पर्याय नाही.
- बाजीराव काटकर
सरपंच, धर्मपुरी