Exclusive; ३० गावांतील दोन हजार शेतकऱ्यांच्या शेतातून जाणार रेल्वे ट्रक

By Appasaheb.patil | Published: July 28, 2021 04:44 PM2021-07-28T16:44:16+5:302021-07-28T16:44:30+5:30

सोलापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाला गती - भूसंपादनासंदर्भातील अहवाल सादर

Exclusive; Railway trucks will pass through the fields of two thousand farmers in 30 villages | Exclusive; ३० गावांतील दोन हजार शेतकऱ्यांच्या शेतातून जाणार रेल्वे ट्रक

Exclusive; ३० गावांतील दोन हजार शेतकऱ्यांच्या शेतातून जाणार रेल्वे ट्रक

googlenewsNext

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याला जोडणारा सोलापूर-उस्मानाबादरेल्वे मार्गाच्या कामाने आता गती घेतली आहे. ३० गावांतील साधारण- दीड ते दोन हजार शेतकऱ्यांच्या शेतातून रेल्वे धावणार असून, ट्रकसाठी लागणारी जमीन भूसंपादनासंदर्भातील अंतिम अहवाल रेल्वे प्रशासनाने सोलापूर, उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पात सोलापूर ते उस्मानाबाद या नव्या रेल्वे मार्गासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर मागील वर्षी या मार्गाच्या भूसंपादनासाठी लागणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी एका एजन्सीची नेमणूक केली होती. या एजन्सीने संपूर्णपणे काम करून किती शेतकऱ्यांची किती जमीन जाणार यासंदर्भातील सातबारा उतारा यासह अंतिम अहवाल जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथील भूसंपादन कार्यालय व उस्मानाबाद येथील भूसंपादन कार्यालयास सादर केला आहे.

-----------

लवकरच होणार मोजणी...

भूसंपादन अहवाल सादर केल्यानंतर भूसंपादन अधिकारी यांनी अंतिम मंजुरी दिल्यानंतर प्रत्यक्ष जमीन मोजणीच्या कामाला सुरुवात होणार आहे. ज्या-ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी रेल्वेच्या मार्गात जाणार आहेत, त्या शेतकऱ्यांच्या सातबारा उतारा यासह अहवाल भूसंपादन विभागाला सादर करण्यात आल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

------------

या गावांमधील जमीन भूसंपादन होणार

सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील बाळे, केगांव, भोगांव, गुळवंची, कारंबा, बाणेगांव, मार्डी, सेवालालनगर, होनसळ, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील वडगांव काटी, तामलवाडी, गंजेवाडी, सूरतगांव, सांगवी काटी, गोंधळवाडी, माळुंब्रा, कदमवाडी, सारोळा, रायखेल, हंगरगा, मंगरूळपाटी, तुळजापूर, तडवळा, बोरी, बावी, वडगांव, पळसवाडी, देवळाली, शेखापूर, उस्मानाबाद, सांजाव जहाँगीरदारवाडीपर्यंत हा मार्ग असणार आहे.

--------

सेंटर लाईन मार्किंगचे काम सुरू

भूसंपादनासंदर्भात अंतिम अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केल्यानंतर रेल्वेकडून सेंटर लाईन मार्किंगचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. ८० दिवसांत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचेही रेल्वे प्रशासनाने सांगितले.

Web Title: Exclusive; Railway trucks will pass through the fields of two thousand farmers in 30 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.