वीज बिल माफ करा अन्यथा मंत्र्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:27 AM2021-02-25T04:27:39+5:302021-02-25T04:27:39+5:30

राज्यामध्ये महाआघाडीचे सरकार आल्यानंतर गेली वर्षभरामध्ये कोरोनाच्या महामारीमुळे सर्व जग एका जागेवर ठप्प झाले होते. शेतकरी, कष्टकऱ्यांना अर्धपोटी ...

Excuse the electricity bill otherwise the ministers will not be allowed to roam the streets | वीज बिल माफ करा अन्यथा मंत्र्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही

वीज बिल माफ करा अन्यथा मंत्र्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही

Next

राज्यामध्ये महाआघाडीचे सरकार आल्यानंतर गेली वर्षभरामध्ये कोरोनाच्या महामारीमुळे सर्व जग एका जागेवर ठप्प झाले होते. शेतकरी, कष्टकऱ्यांना अर्धपोटी राहून या महामारीचा सामना करावा लागला. या काळातील वीज बिल माफ करण्याची घोषणा या सरकारने केली मात्र ती हवेतच विरली. सोलापूर जिल्ह्यासह करमाळा व माढा तालुक्यातील शेतकऱ्यांची शेती पंपाचे वीज बिल थकीत असल्याने कनेक्शन तोडण्याची मोहीम वीज वितरण कंपनीकडून सुरु आहे.

हा कारभार त्वरित न थांबल्यास वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला घेराव घालण्याचे काम केले जाईल, असा स्पष्ट इशारा खुपसे-पाटील यांनी दिला.

सध्या शेतकऱ्यांच्या कृषी मालाला भाव नाही. ऊस, केळी, कापूस, उडीद कांदा या पिकासह भाजीपाला यांना भाव नाही. बार्शी विभागामध्ये १ लाख कृषी वीज कनेक्शन आहेत तर जिल्ह्यामध्ये साडेतीन ते चार लाख कृषी पंप वीज कनेक्शन आहेत. या कृषीपंपाची थकीत वीज बिलापोटी सध्या वीज तोडणी मोहीम वीज वितरण कंपनीकडून सुरु आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय असल्याचे खुपसे-पाटील यांचे म्हणणे आहे.

यावेळी राणा वाघमारे, शरद एकाड, अतुल राऊत, दिपाली डिरे, बंडू शिंदे, किशोर शिंदे, बालाजी तरंगे, काका कोळी, अभिजित नवले, संतोष कांबळे, जयसिंग पाटील, नाना भोगल, महेश घरबुडे, काका घरबुडे, गणेश वैभासे, सोमा कातूरे, राहुल सावंत, सुभाष थोरात, कल्याण गवळी, तेजस गाडे, विठ्ठल कानगुडे, हर्षवर्धन पाटील, विजय खुपसे, भय्या देवडकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Excuse the electricity bill otherwise the ministers will not be allowed to roam the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.