हात नसलेल्या सूरजची पायानं कसरत; पायांच्या बोटात पेन्सील धरून शिक्षणाचा केला श्रीगणेशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:38 PM2020-12-03T16:38:55+5:302020-12-03T16:56:23+5:30

जागतिक दिव्यांग सहायता दिन विशेष; उच्चशिक्षित क्लासवन अधिकारी होण्याचा मानस

Exercising the feet of the sun without both hands; He started his education by holding a pencil in his toe | हात नसलेल्या सूरजची पायानं कसरत; पायांच्या बोटात पेन्सील धरून शिक्षणाचा केला श्रीगणेशा

हात नसलेल्या सूरजची पायानं कसरत; पायांच्या बोटात पेन्सील धरून शिक्षणाचा केला श्रीगणेशा

Next

एल. डी. वाघमोडे

माळाशिरस : उच्चशिक्षित होऊन मोठे अधिकारी बनण्याचा मानस अनेक तरुणांचा असतो. मराठी अभ्यास, लिखाणावर भर द्यावा लागतो; मात्र जन्मापासून दोन्ही हात नसलेल्या सूरज मुजावर या तरुणाने पायाच्या सहाय्याने लिखाण व दैनंदिन कामे करून उच्चशिक्षित क्लासवन अधिकारी होण्याचा मानस व्यक्त केल्यामुळे त्याचा आदर्श दिव्यांग तरुणांपुढे प्रेरणादायी ठरत आहे.

दिव्यांगांना मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी शासन  सर्वतोपरी प्रयत्न करते; मात्र दिव्यांग असतानाही स्वतःच्या कौशल्याने, जिद्दीने शिक्षण घेणारा पिलीव (ता . माळशिरस) येथील  दिव्यांग तरुण सूरज शब्बीर मुजावर हा दोन्ही पाय नसताना रोजच्या व्यवहारातील दैनंदिन कामाबरोबर लिखाणाचेही अस्खलितपणे काम करत दिव्यांगांसमोर नवा  आदर्श निर्माण करीत आहे.   त्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आजोबांची धडपड आहे.

शिक्षणाची जिद्द 
सर्वसामान्य कुटुंबातील जन्मताच दोन्ही पायाने अपंग असणाऱ्या सूरजला त्याच्या आजोबांनी स्वावलंबनाचे बाळकडू दिले. त्यामुळे सूरजने पायांच्या बोटात पेन्सील धरून  शिक्षणाचा श्रीगणेशा केला. यानंतर त्याने पायाने पेपर लिहून दहावीला ६५ टक्के गुण मिळवले. सध्या तो कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय (पिलीव) येथे बारावीच्या वर्गात शिकत आहे. त्याचे वडील सायकल दुरुस्ती व चप्पलचे दुकान चालवून चरितार्थ चालवतात; मात्र सूरजला इतर मुलांप्रमाणे स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी संपूर्ण कुटुंबाचा जिद्दीनेे प्रवास सुरू आहे.
 

Web Title: Exercising the feet of the sun without both hands; He started his education by holding a pencil in his toe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.