सोलापुरात बंजारा हस्तकलेच्या वस्तूंंचे प्रदर्शन; जाणून घ्या तारीख, वेळ अन् ठिकाण
By Appasaheb.patil | Updated: July 20, 2022 14:25 IST2022-07-20T14:25:45+5:302022-07-20T14:25:58+5:30
साड्या, कुशन्स् अन् गृहसजावटीसाठी लागणाऱ्या हस्तकलेच्या वस्तू मिळणार स्वस्तात

सोलापुरात बंजारा हस्तकलेच्या वस्तूंंचे प्रदर्शन; जाणून घ्या तारीख, वेळ अन् ठिकाण
सोलापूर : साड्या, ५०० हून अधिक कुशन्स, वॉल हँगिंग फ्रेम्स, घड्याळ, ओढणी, शाल अशा वापरतील वस्तूंचे प्रदर्शन २२, २३ व २४ जुलै २०२२ रोजी सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालय, अलंकार हॉल येथे आयोजित करण्यात आले आहे. ऑपरेशन परिवर्तन उपक्रमांतर्गत बंजारा हस्तकलेच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री उपक्रम हा सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या वतीने राबविण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रदर्शनातील सर्व वस्तू अन्य बाजारपेठेतील दुकानांच्या तुलनेत स्वस्त दरात मिळणार आहेत. तरी सोलापूर शहरासोबतच जिल्ह्यातील सर्वांनी या प्रदर्शनाला भेट देऊन वस्तूंची खरेदी करावी, असे आवाहन ग्रामीण पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
मुळेगाव तांड्यातील ४१ महिलांना घेऊन सुरू केलेला उद्योग कपडे शिवायचा उपक्रम सुरू असून, मिटकॉन संस्थेमार्फत शिवणकाम व फॅशन डिझाईनचे प्रशिक्षण दिले. त्यापैकी २० महिलांनी स्वतःच व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांना मुळेगावचे पालक अधिकारी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी हॉल, शिलाई मशीन आणि कर्जसुद्धा उपलब्ध करून दिले. त्या आता जर्मनीत निर्यात करणाऱ्या अपेक्स गारमेंट कंपनीसोबत काम करीत आहेत. या उपक्रमांतर्गत २० बचत गटांतील २०० महिलांना पुण्यातील फॅशन डिझायनरतर्फे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
--------
२२ जुलैला उद्घाटन
ऑपरेशन परिवर्तन अंतर्गत बंजारा हस्तकलेच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचा प्रारंभ २२ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालय, अलंकार हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
--------