सोलापूर महानगरपालिकेच्या तिजोरीतून नरेंद्र मोदी सभेसाठी झाला ९४ लाखांचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 12:37 PM2019-01-19T12:37:40+5:302019-01-19T12:39:17+5:30
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ जानेवारी रोजी झालेल्या दौºयाचा ९४ लाख रुपयांचा खर्च आर्थिक अडचणीत असलेल्या महापालिकेच्या ...
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ जानेवारी रोजी झालेल्या दौºयाचा ९४ लाख रुपयांचा खर्च आर्थिक अडचणीत असलेल्या महापालिकेच्या माथी आला आहे. विशेष म्हणजे मोदींच्या या दौºयात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, रे नगर आणि स्मार्ट सिटी कंपनीच्या कामांचे उद्घाटन केले होते.
पंतप्रधान मोदी यांच्या दौºयाच्या निमित्ताने महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने विमानतळ ते पार्क स्टेडियम या मार्गावर विविध कामे केली. या दौºयामुळे शहराच्या मुख्य रस्त्याचे चित्र पालटून गेले. मोदींची सभा पार्क स्टेडियमवर झाली. त्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजन महापालिकेला करावे लागले. मोदींचे हेलिकॉप्टर होम मैदानावर उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला. होम मैदान परिसरात विविध कामे करण्यात आली.
या सर्व कामांच्या वर्क आॅर्डर महापालिकेकडून देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील कामे बांधकाम विभागानेच केली आहेत. महापालिकेने केलेल्या कामांचा खर्च ९४ लाख २१ हजार रुपये झाला आहे. विविध विभागांनी नगर अभियंता विभागाकडे हा खर्च सादर केला आहे. महापालिका आर्थिक अडचणीत आहे. नगरसेवकांना भांडवली कामांसाठी निधी मिळालेला नाही. भांडवली कामांसाठी निधी द्या म्हणून नगरसेवक आयुक्तांकडे फेºया मारत असतात. मोदींच्या दौºयाचा खर्च महापालिकेच्या माथी पडल्यामुळे या विषयावर राजकारण होण्याची शक्यता आहे.
असा झाला खर्च
- चार हुतात्मा पुतळा ते जलतरण तलाव व अॅप्रोच रस्ते तयार करणे, नॉर्थकोट हायस्कूल पाठीमागील रस्ता करणे, डफरीन चौक ते महापौर निवास, रामलाल चौक, सरस्वती चौक यादरम्यान रस्ता करणे (१९ लाख ४४ हजार), होटगी रोड महिला हॉस्पिटल ते पटवर्धन चौक पॅचवर्क करणे (५ लाख ९० हजार), पार्क स्टेडियमला पांढरा फ्रायमर कोट करणे (५ लाख ७० हजार), शहरात होर्डिग्ज, प्रवेश पत्र, निमंत्रण पत्रिका, जाहिराती व बॅक ड्रॉप (४ लाख ८० हजार), शहरात कमान व होर्डिंग बसविणे (८३ हजार), शहरातील विविध ठिकाणी भिंतीवर पांढरा रंग मारणे (२ लाख ४७ हजार).
क्लब हाऊस व चार पुतळा येथील रंगरंगोटी करणे ( १ लाख ८५ हजार), पंतप्रधान व इतर अधिकाºयांच्या चहापानासाठी खर्च (७७ हजार रुपये), इंदिरा गांधी स्टेडियम येथे मुख्य कार्यक्रमस्थळी स्टेज, मंडप, खुर्च्या, बॅरिकेडिंग, साऊंड सिस्टीम, सजावट, पिण्याचे पाणी (४५ लाख ६८ हजार), पार्क स्टेडियम आणि शहरात फलक बसविणे (३६ हजार), विमानतळ ते चार पुतळ्यापर्यंत लाकडी व लोखंडी बॅरिकेडिंग, पडदा टाकणे (४ लाख ३० हजार), होम मैदानाभोवती पत्रा पार्टीशन मारणे (१ लाख ३० हजार), पार्क स्टेडियममध्ये वायरिंग करणे (२५ हजार), होम मैदान आणि नॉर्थकोट प्रशाला येथे पाण्याच्या टॅँकरने पाणी मारणे (१७ हजार), डिजिटल व्हिडिओ (९ हजार), निवेदिका मानधन (३० हजार).
विशेष अनुदानाची प्रतीक्षा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौºयानिमित्त केलेल्या कामांच्या वर्कआॅर्डर महापालिकेने दिल्या होत्या. या कामाची बिले विविध विभागांनी तयार केली आहेत. पण ही बिले अद्याप स्वीकारण्यात आलेली नाहीत. राज्य शासनाकडून विशेष अनुदान येईल, अशी महापालिकेला अपेक्षा आहे.
- अजय पवार,
मुख्य लेखाधिकारी, महापालिका.