हुतात्मा स्मृती मंदिरात आता आंतरराष्ट्रीय थिएटरचा अनुभव; नव्या ध्वनी व्यवस्थेची चाचणी यशस्वी

By शीतलकुमार कांबळे | Published: March 21, 2024 07:19 PM2024-03-21T19:19:31+5:302024-03-21T19:19:44+5:30

हुतात्मा स्मृती मंदिर येथे नवीन ध्वनी व्यवस्था (साउंड सिस्टीम) बसविण्यात आली.

Experience international theater now at Martyrs Memorial Temple Test of new sound system successful | हुतात्मा स्मृती मंदिरात आता आंतरराष्ट्रीय थिएटरचा अनुभव; नव्या ध्वनी व्यवस्थेची चाचणी यशस्वी

हुतात्मा स्मृती मंदिरात आता आंतरराष्ट्रीय थिएटरचा अनुभव; नव्या ध्वनी व्यवस्थेची चाचणी यशस्वी

सोलापूर: हुतात्मा स्मृती मंदिर येथे नवीन ध्वनी व्यवस्था (साउंड सिस्टीम)बसविण्यात आली. याची चाचणी गुरुवार 21 मार्च रोजी घेण्यात आली. यावेळी नाट्यकलावंतांना आंतरराष्ट्रीय थिएटरमध्ये बसल्याचा अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले. शहर व जिल्ह्यातील नाट्यकलावंतांनी महापालिकेकडे हुतात्मा स्मृती मंदिर येथील साउंड व्यवस्था बलण्याविषयी मागणी केली होती. त्यानुसार दिल्ली येथील इंजिनिअर व तंत्रज्ञांनी उपस्थित राहात आंतरराष्ट्रीय दर्जाची साउंड सिस्टीम बसविली. डायसचा माईक, हँगिंग माईक, फूट माईक यासोबतच साउंड बसविण्यात आले. याची चाचणी घेऊन आवाजाची गुणवत्ता तपासण्यात आली. चाचणी करत असताना महापालिकेचे अधिकारी यांची उपस्थिती होती.

सध्या नाट्यगृहात असलेली प्रकाश योजना व्यवस्थित काम करत नाही. कलावंत बाहेरुन प्रकाश योजनेची व्यवस्था करतात. महापालिकेने प्रकाश योजनेची व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे, उपआयुक्त परदेशी, हुतात्मा स्मृती मंदिरचे व्यवस्थापक प्रदीप जोशी, शिवकुमार धनशेट्टी, उपनगरीय शाखेचे अध्यक्ष विजय साळुंके , कार्याध्यक्ष जयप्रकाश कुलकर्णी , सुमित फुलमामडी , ज्येष्ठ रंगकर्मी श्रीपाद येरमाळकर , मिलिंद पटवर्धन , किरण फडके, राजू पाटील, व्यंकटेश रंगम, आशुतोष नाटकर, किरण लोंढे साहित्य परिषदेचे पद्माकर कुलकर्णी, रंगकर्मीं श्रीपाद येरमाळकर आदी उपस्थित होते.

Web Title: Experience international theater now at Martyrs Memorial Temple Test of new sound system successful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.