तज्ज्ञांचा सल्ला; पामतेल हृदयासाठी अपायकारक; स्वयंपाकात वापर टाळणे योग्यच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 12:17 PM2021-11-24T12:17:36+5:302021-11-24T12:18:05+5:30
लग्नसराईमुळे सरकी तेलाची मागणी वाढली
सोलापूर : तेलाचे दर वाढल्यामुळे सामान्य कुटुंबीयांचे बजेट कोलमडले आहे. यामुळे बचत करण्यासाठी महिलांकडून पामतेलाचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. पण पामतेल हे हृदयाला जास्त अपायकारक असल्याने याचा वापर आहारात करू नये, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
सध्या लग्नसराई सुरू असल्यामुळे तेलाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे सरकी तेलाची मागणी बाजारात वाढत आहे. अशाच प्रकारे मागणी वाढल्यास दरांमध्ये फरक पडू शकतो, असे मत व्यापाऱ्यांनी दिली.
सध्या अनेक ठिकाणी फास्ट फूड बनवताना तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. यामुळे फास्ट फूड खाणे टाळावे. शरीराला मोहरी, शेंगा आणि सरकी तेल पोषक असतात. याशिवाय ज्यांना परवडते त्यांनी घाणीच्या तेलांचा वापर करावा, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
- शेंगा १६०
- सरकी १५५
- पामतेल १३०
- करडी २००
करडीच्या तेलाची मागणी सोलापुरात खूप कमी
करडीच्या तेलाची मागणी सोलापुरात खूप कमी प्रमाणात आहे. हे तेल खूप कमी प्रमाणात खाल्ले जाते. करडीची लागवड कमी झाल्यामुळे यांचा मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. यामुळे अनेक दिवसांपासून करडीचे तेल दोनशे रुपये किलो दराने विकले जात आहे. जोपर्यंत करडईची लागवड वाढत नाही, तोपर्यंत हे दर २०० रुपयांपर्यंत राहतील असा अंदाज अक्षय परदेशी यांनी व्यक्त केला.
सध्या बाजारात लग्नसराईमुळे सरकी तेलाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सोबतच पूर्वी खुल्या तेलाची मागणी मोठ्या प्रमाणात होत होती. पण आता सीलबंद तेलाच्या डब्याची मागणी जास्त मस्त आहे.
सुमनबाई परदेसी, व्यापारी
शरीराच्या गरजेनुसार आपण वेगवेगळे तेल आहारात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे याचा शरीराला मोठा फायदा होतो. पण पामतेलापासून बनवलेले पदार्थ खाणे प्रत्येकांनी कटाक्षाने टाळावे. पामतेलामुळे हृदयाला मोठा धोका असतो. त्यामुळे प्रत्येकाने याची खबरदारी घ्यायलाच पाहिजे. सोबतच पॅकबंद तेलापेक्षा घाणीचे तेल वापरणे गरजेचे आहे.
अश्विनी अंधारे, आहार तज्ज्ञ