हेलिकॉप्टरद्वारे बिबट्याची शोधमोहीम अशक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:35 AM2020-12-14T04:35:21+5:302020-12-14T04:35:21+5:30

बिबट्याला पकडायचे की ठार मारायचे अशी शंका तालुक्यातून व्यक्त होत असल्याने लोकमत प्रतिनिधीने रविवारी राज्याचे वनमंत्री संजय राठोड ...

Experts say the search for the leopard by helicopter is impossible | हेलिकॉप्टरद्वारे बिबट्याची शोधमोहीम अशक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत

हेलिकॉप्टरद्वारे बिबट्याची शोधमोहीम अशक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत

Next

बिबट्याला पकडायचे की ठार मारायचे अशी शंका तालुक्यातून व्यक्त होत असल्याने लोकमत प्रतिनिधीने रविवारी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांना भ्रमनध्वनीवर संपर्क साधून माहिती घेतली.

करमाळा तालुक्यात फुंदेवाडी, अंजनडोह व चिखलठाण या तीन ठिकाणी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला. त्यानंतर तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाची यंत्रणा गेल्या १० दिवसांपासून कार्यरत आहे. परंतु बिबट्या सापडत नसल्याने उजनी बॅकवॉटर भागातील शेतकऱ्यांतून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वनविभागाच्या वतीने बिबट्याला पकडण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लावली. उजनी बॅकवॉटर भागात उसाचे मळे व केळीच्या बागा असल्याने त्याला लपण्याची जागा आहे. त्यामुळे शोधण्यास अडचणी निर्माण येत आहेत. हा बिबट्या भुकेला असून, तो एका जागेवर न थांबता सतत पळत आहे. त्याने कोणाचे मुंडके खाल्ले, तर कोणाचे धड खाल्ले असे सांगून हेलिकॉप्टरने बिबट्याचा शोध घेणे शक्य नाही व हेलिकॉप्टरमधून त्याला शूटही करता येत नाही. वनविभागाचे स्वत:चे गडचिरोली येथे हेलिकॉप्टर आहे. हेलिकॉप्टरमधून आजपर्यंत कुठेच कोणत्याही हिंंस्त्र प्राण्यास शूट केलेले नाही असे तज्ज्ञांचे मत आहे. करमाळा तालुक्यात बिबट्याच्या उपद्रवाचा दररोज सकाळ, संध्याकाळी असे दोन्ही वेळेस अधिकाऱ्यांकडून माहिती घेत आहे. ड्रोन कॅमेरे, डॉग स्कॉड व अन्य यंत्रणा लावून लवकरात लवकर बिबट्याचा शोध घेतला जाईल, असे वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

रविवारी बिबट्या दिसलाच नाही

गेल्या तीन दिवसांपासून त्या नरभक्षक बिबट्याचा मुक्काम उजनी बॅकवॉटर भागातील बिटरगाव-वांगी, ढोकरी, वांगी नं.१, भिवरवाडी या भागात आहे. बिटरगाव-वांगी व ढोकरी भागात वनविभागाचे पथक ड्रोन कॅमेरे व डॉगस्कॉडच्या मदतीने शोध घेत आहेत. वनविभागाचे राज्याचे वनरक्षक सुनील लिमये हे नागपूर येथून घटनास्थळी आले व त्यांनी पाहणी करून वनविभागाच्या पथकास सूचना केल्या आहेत. दरम्यान, बिबट्या पकडला जात नसल्याने या परिसरात भीतीचे वातावरण आहे. शेतीची कामे बंद असून, ऊसतोडणी थांबली आहे. ग्रामस्थ घराच्या बाहेर पडायला घाबरत आहेत.

Web Title: Experts say the search for the leopard by helicopter is impossible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.