पूर्वजाविषयी कृतज्ञता, श्रध्दा व्यक्त करण्यासाठी पितृपंधरावडा पाळा - सुनिल शास्त्री गुरूजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 06:33 PM2018-09-29T18:33:19+5:302018-09-29T18:36:27+5:30
सोलापूर : भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षातील पूर्ण पंधरवड्यास श्राध्दपक्ष म्हटले जाते़ याच भाद्रपद शुक्ल पोर्णिमेच्या दिवसात वडीधाºया मंडळींना संतुष्ट करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते़ यादिवसात आपल्या पूर्वजाच्या नावाचा पितर बसवून श्राध्द, अन्नदान केल्याने आपल्या घरात सुख, समृध्दी, शांती लाभते असे मत सोलापूरचे प्रसिध्द शास्त्री सुनिल शास्त्री गुरूजी यांनी व्यक्त केले
पितृपक्ष पंधरावडयाबद्दल माहिती देताना सुनिल शास्त्री यांनी सांगितले की, आपल्या पूर्वजाविषयी कृतज्ञता व श्रध्दा व्यक्त करण्याच्या काळास पितृपंधरवडा किंवा श्राध्दपक्ष म्हणतात़ ज्या प्रमाणे आपण आपल्या कुलदैवतांची पूजा केल्याने समाधान, शांती प्राप्त होते असे वाटते त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजांच्या नावाचा पितर बसवून श्राध्द केल्याने सुख, समृध्दी लाभते़ पितृपंधरावड्याची विधी करताना लोकांनी दक्षिणेच्या बाजुला तोंड करून आपल्या पूर्वजांची नावे घ्यावीत, अंगठयावरून पाणी सोडून पितृाचा ब्राम्हण व देवाचा ब्राम्हण असे दोघांना जेवण द्यावे, शिवाय अन्न लोकांना अन्नदान केल्यास उत्तमच़ याचकाळात पूर्वजाच्या चांगल्यासाठी छत्री, काठी, रोख स्वरूपातील पैसे दान स्वरूपात देतात.
ज्या लोकांना तिथी लक्षात येत नसेल तर पितृपंधरवड्याच्या शेवटच्या दिवशी अमावास्या येते. तिला सर्वपित्री अमावास्या म्हटले जाते. या दिवशी श्राध्द करावे़ यादिवशी सूर्य, चंद्र यांची युती होते. सूर्य कन्या राशीत प्रवेश करतो. श्राध्द पक्षात आपले पूर्वज पृथ्वीवर येऊन आपल्या कुटूंबियांसोबत वास्तव्य करत असतात, असा उल्लेख पुराणात आहे. त्यांच्या संतुष्टीसाठी श्रेष्ठ ब्राह्मणांना जेवण, दान दिले जाते. श्राध्द पक्षात तिर्थस्थानी जाऊन त्रिपींड दान केले जाते. नारायण नागबलीची पूजा केली जाते. आपल्या कुटुंबात सुख- समुध्दी नांदावी म्हणून दानधर्म केले जात असतात.
जो कुटुंबप्रमुख हा पितृपंधरावडा पाळत नाही त्याच्या घरातील प्रत्येक कामात अडथळे निर्माण होतात, रोगराई होते, अपघात होतात, लक्ष्मी, धनाचा नाश होतो, कुलनाश होतो, मनातील इच्छा अपुरी राहते, स्वप्न भंग होतात असे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते असेही सुनिल शास्त्री गुरूजी यांनी सांगितले़