अर्ज भरण्यासाठी सोमवार पर्यंत मुदतवाढ, १५ जून पासून सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा

By बाळकृष्ण दोड्डी | Published: June 3, 2023 05:12 PM2023-06-03T17:12:09+5:302023-06-03T17:12:32+5:30

विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. रजनीश कामत, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. गौतम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षेचे नियोजन सुरू आहे.

Extension of application deadline till Monday, Solapur University Exams from 15th June | अर्ज भरण्यासाठी सोमवार पर्यंत मुदतवाढ, १५ जून पासून सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा

अर्ज भरण्यासाठी सोमवार पर्यंत मुदतवाढ, १५ जून पासून सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा

googlenewsNext

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमांचे परीक्षा अर्ज भरण्यासाठी सोमवार, ५ जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर यांनी दिली.

विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. रजनीश कामत, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. गौतम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षेचे नियोजन सुरू आहे. त्याप्रमाणे सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी दि. ३ जून २०२३ पर्यंतची मुदत होती. त्यात वाढ करून आता ५ जून पर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षेचे अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर ७ जून पर्यंत महाविद्यालयांनी परीक्षेचे इन्व्हाईस शुल्क विद्यापीठाकडे जमा करावे, असे परीक्षा संचालक डॉ. गणपूर यांनी सांगितले.

गुरूवार, १५ जून पासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. सर्वप्रथम बीए, बीकॉम, बीएससी, बीबीए, बीसीए तसेच एमए,  एमकॉम, एमएससी, शिक्षणशास्त्र या परीक्षांना सुरुवात होईल. १९ जूनपासून अभियंत्रिकीच्या नियमित परीक्षांना सुरुवात होईल. ५ ऑगस्टपासून फार्मसी अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू होतील. १५ जून ते ३१ जुलै दरम्यान विद्यापीठाच्या परीक्षा पूर्ण होतील.

Web Title: Extension of application deadline till Monday, Solapur University Exams from 15th June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.