सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ

By बाळकृष्ण दोड्डी | Published: December 23, 2022 12:04 PM2022-12-23T12:04:56+5:302022-12-23T12:05:09+5:30

सर्व अभ्यासक्रमांच्या प्रथम व द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांकरिता महाविद्यालयात व पदव्युत्तर अधिविभागांमध्ये २४ डिसेंबरपर्यंत विनाविलंब शुल्क फॉर्म भरता येणार आहे.

Extension of time for filling examination form for students of Solapur University | सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ

सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ

googlenewsNext

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या प्रथम व द्वितीय तसेच तृतीय ते पाचव्या वर्षापर्यंतच्या विविध अभ्यासक्रमांसाठी परीक्षा फॉर्म भरण्याकरिता मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर यांनी दिली.

सर्व अभ्यासक्रमांच्या प्रथम व द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांकरिता महाविद्यालयात व पदव्युत्तर अधिविभागांमध्ये २४ डिसेंबरपर्यंत विनाविलंब शुल्क फॉर्म भरता येणार आहे. ३१ डिसेंबरपर्यंत विलंब शुल्कासहीत फॉर्म भरण्याची सोय विद्यार्थ्यांकरिता आहे. तसेच इतर सर्व अभ्यासक्रमांच्या तृतीय ते पाचव्या वर्षांच्या विद्यार्थ्यांकरिता २ जानेवारी २०२३ पर्यंत विनाविलंब परीक्षा अर्ज महाविद्यालय अधिविभागांमध्ये भरता येणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणपूर यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Extension of time for filling examination form for students of Solapur University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.