मंगळवेढ्यासाठी पोलिसांचे अतिरिक्त बल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:27 AM2021-04-30T04:27:16+5:302021-04-30T04:27:16+5:30
मालवंडीत कोरोनाविषयक जनजागृती वैराग : एकात्मिक बालविकास विभाग पंचायत समिती बार्शीच्या वतीने मालवंडी येथे कोरोना जनजागृती रॅली काढण्यात आली. ...
मालवंडीत कोरोनाविषयक जनजागृती
वैराग : एकात्मिक बालविकास विभाग पंचायत समिती बार्शीच्या वतीने मालवंडी येथे कोरोना जनजागृती रॅली काढण्यात आली. बालविकास अधिकारी सुधीर ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली काढण्यात आली. सरपंच हनुमंत व्हनमाने, ग्रामपंचायत सदस्य नागनाथ गवळी, रामलिंग घेवारे, शिवाजी पाटील, भोसले, मुंडे, भारत होनराव, नितीन पाटील उपस्थित होते. या रॅलीसाठी अंगणवाडी सेविका जयश्री उकरंडे, जिजाबाई यादव, रेणुका राजगुरु, दीपाली यादव, सुरेखा काटे, आशा क्षीरसागर, प्रभावती भागवते, राणूबाई सरवदे यांनी परिश्रम घेतले.
आर्थिक मदतीची नाभिक समाजाची मागणी
कुर्डूवाडी : नाभिक समाजाची अवस्था लॉकडाऊन काळात अत्यंत बिकट झाली आहे. जेव्हा काम करावे तेव्हा पोट भरते अशी स्थिती आहे. या काळात आर्थिक मदत मिळावी यासाठी समाजाच्या वतीने एका शिष्टमंडळाने पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना भेटून निवेदन देण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांनी नाभिक समाजाला मदत कशी देता येऊ शकेल यासाठी प्रयत्न चालू असल्याचे आश्वासन दिले. लॉकडाऊनमुळे केशकर्तनालये बंद ठेवण्यात आल्याने उपासमारी ओढावली आहे. यावेळी संघटनेचे राज्य युवक अध्यक्ष सुधीर गाडेकर, रामदास राऊत, वैजिनाथ राऊत, पोपट गाडेकर, राजू गोरे सहभागी झाले होते.
रांझणीत ५० जणांना लसीकरण
माढा : तालुक्यात रांझणी येथे कोरोना लसीकरण राबविण्यात आले. माजी कृषी संवर्धन सभापती संजय पाटील भीमानगरकर यांच्या नेतृत्वाखाली हे लसीकरण शिबिर पार पडले. या शिबिरात ५० जणांना लस देण्यात आली. आलेगाव बुद्रूक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ. नेहा देशमुख यांनी या लसीकरणासाठी विशेष प्रयत्न केले. लसीकरणापूर्वी या लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीत चार जण बाधित निघाले. यावेळी ग्रामसेवक एल. एम. शेख, सरपंच पांडुरंग माने उपस्थित होते.
रावगाव येथे मास्क, सॅनिटायझरचे वाटप
करमाळा : बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असणारे सुशांत शिंदे यांनी रावगाव या मूळगावी ग्रामस्थांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता शिंदे यांनी हा उपक्रम हाती घेतला. यावेळी प्रशांत शिंदे, पवन पवार, गणेश कांबळे, भाग्येश्वर बरडे, लक्ष्मण रासकर, हुसेन शेख, आबा जाधव उपस्थित होते.
मल्लिकार्जुन यात्रा साधेपणाने साजरी
अक्कलकोट : येथील ग्रामदैवत मल्लिकार्जुन देवाची यात्रा सर्व विधी पैकी काही विधी पार पाडत साधेपणाने साजरी करण्यात आली. यंदा यात्रा रद्द करण्यात आल्याचा निर्णय यात्रा व रथोत्सव कमिटीने घेतला होता. यावेळी म.नि.प्र. बसवलिंग महास्वामी, अध्यक्ष शिवलिंग स्वामी, इरेश पाटील, राजशेखर नागुरे, सिद्धेश्वर हिरेमठ, रुद्रय्या स्वामी, कांतेश्वर पाटील, इरय्या सांभाळमठ, अशोक हरवाळकर उपस्थित होते.
वेळापुरात ५४४ जणांचे लसीकरण
माळशिरस : तालुक्यात वेळापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने घेण्यात आलेल्या शिबिरात ५४४ जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. आतापर्यंत जवळपास ३ हजार सर्वसामान्यांना ही लस देण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. ओव्हाळ यांनी ही लस दिली. सर्वसामान्यांची गर्दी होऊ नये म्हणून एकाच वेळी तीन खिडक्या सुरु करण्यात आल्या आणि नाव नोंदणीचा वेग वाढवण्यात आला. या लसीकरणासाठी डॉ. अजिंक्य बंडगर, डॉ. हेमा काळे, सहायक निर्मला मोरे, आरिफा शेख, आरोग्य सेविका, चंद्रकांत उगाडे, सुनील पुलगेट, काळूराम कुदळे उपस्थित होते.
सारिका गडसिंगचे सेट परीक्षेत यश
बार्शी : मळेगाव येथील सारिका प्रकाश गडसिंग या गणित विषयातून सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. त्या कर्मवीर. ना. मा. गडसिंग मित्र विद्यालयाच्या माजी विद्यार्थी आहेत. त्यांच्या यशाबद्दल नर्मदेश्वर शिक्षण संस्थेच्या सचिव सखुबाई गडसिंग, सहसचिव हेमंत गडसिंग, संचालक विलास मिरगणे, प्राचार्य विकास बोराडे, प्रा. प्रभाकर गव्हाणे, गौस शेख, प्रकाश गडसिंग, विनोद दीक्षित, सरिता दीक्षित यांनी कौतुक केले.