सरकारबद्दल शेतकºयांमध्ये प्रचंड संताप : अजित नवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 03:10 PM2017-08-21T15:10:27+5:302017-08-21T15:10:27+5:30
सोलापूर दि २१ : कर्जमाफीसाठी शेतकºयांकडून आॅनलाईन अर्ज भरून घेतले जात आहेत. यासाठी पुरेशी केंदे्र उपलब्ध नाहीत. दुसरीकडे अनेक वेळा सर्व्हर जाम होत असल्यामुळे ही प्रक्रिया पूर्णपणे अपयशी ठरली असून, यामुळे शेतकºयांत प्रचंड संताप निर्माण झाल्याचे शेतकरी सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ. अजित नवले यांनी रविवारी शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
आॅनलाइन लोकमत सोलापूर

अखिल भारतीय किसान सभेच्या राज्य कार्यकारिणी बैठकीसाठी तसेच शेतकरी नेते वसंतराव आपटे यांच्या शोकसभेला उपस्थित राहण्यासाठी डॉ. नवले हे सोलापुरात आले होते. ते पत्रकार परिषदेत पुढे म्हणाले, शेतकरी आंदोलन दडपण्यासाठी सरकारने अनेक प्रकारे प्रयत्न केले. पातळी सोडून आरोप केले, आंदोलकांवर चिखलफेक केली. शेतकºयांच्या एकजुटीमुळे त्यांचे हे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. शेतकºयांना कर्जमाफी दिली. मात्र फॉर्म भरण्याची प्रक्रिया आॅनलाईन केली. यामागे शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळू नये, अशीच योजना असल्याचे नवले म्हणाले.
या सर्व प्रकारामुळे शेतकºयांमध्ये सरकारच्या विरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. आॅनलाईन प्रक्रिया तातडीने थांबवावी, बँकेत उपलब्ध असणाºया माहितीच्या आधारे सरसकट शेतकºयांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी शेतकºयांच्या वतीने अजित नवले यांनी केली आहे.
या पत्रकार परिषदेला जिल्हा सुकाणू समितीचे निमंत्रक सिद्धप्पा कलशेट्टी, शिवानंद झळके, महिबूब सय्यद, खंडू वाघचौरे, महमद शेख, जावेद आवटे, रावसाहेब होनमाने आदी उपस्थित होते.
---------------------
लवकरच बैठक
च् आॅनलाईन कर्जमाफीतील घोळाबाबत संपूर्ण माहिती घेतली जात असून, याबाबत नेमकी भूमिका ठरविण्यासाठी शेतकरी सुकाणू समितीच्या वतीने लवकरच राज्यस्तरीय बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती डॉ. नवले यांनी दिली.