मालवंडीत शेड उचकटून फॅब्रिकेशन साहित्य पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:20 AM2021-04-05T04:20:12+5:302021-04-05T04:20:12+5:30
बार्शी : बार्शी तालुक्यात मालवंडी येथे एका व्यक्तीने शेतात कुटुंबियांची उपजीविकेसाठी ॅफब्रिकेशन साहित्य, मशिनरी साहित्य आणून व्यवसाय सुरू ...
बार्शी : बार्शी तालुक्यात मालवंडी येथे एका व्यक्तीने शेतात कुटुंबियांची उपजीविकेसाठी ॅफब्रिकेशन साहित्य, मशिनरी साहित्य आणून व्यवसाय सुरू केला. दुकान बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी दुकानाचे पत्रे उचकटून २५ हजारांचे साहित्य चोरून नेल्याची घटना घडली.
४ एप्रिलला रोजी पहाटेच्या सुमारास चोरीचा हा प्रकार घडला. याबाबत मालक नागेश बाळासाहेब होनराव (वय २८, रा. मालवंडी, ता. बार्शी) यांनी तालुका पोलिसांत फिर्याद दिली आहे. चार हजारांचे वेल्डिंग मशीन, सात हजारांचे कटर, शंभर फूट केबल, पाच हजारांची ड्रील मशीन व इतर साहित्य चोरट्यांनी पळविले. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रियाज शेख करत आहेत.
----
सहा महिन्यांपूर्वी सुरू केला होता व्यवसाय
नागेश होनराव यांनी सहा महिन्यांपूर्वी उपजीविकेसाठी शेतात पत्र्याचे शेड उभारून तेथे फॅब्रिकेशन व्यवसाय सुरू केला होता. यासाठी दोन कामगारही ठेवले. शनिवारी दिवसभर व्यावसाय केल्यानंतर ३ एप्रिल रोजी रात्री दुकानातील जनावरांसाठी सुग्रास खाद्य घेऊन कुलूप लावून गेले होते. रविवारी सकाळी खाद्य आणण्यासाठी गेल्यानंतर या दुकानाचा पत्रा उचकटलेला दिसला. आत डोकावले असता मशिनरी साहित्य दिसले नाही.