पालिका निवडणुकीच्या तोंडावर शेकाप, सेनेला धक्कातंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:30 AM2021-06-16T04:30:58+5:302021-06-16T04:30:58+5:30

सांगोला : शेकापचे माजी नगरसेवक शिवाजी बनकर, शिवसेना माजी तालुकाप्रमुख मधुकर बनसोडे, विजय राऊत यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ...

In the face of municipal elections, Peshwa, a shock to the army | पालिका निवडणुकीच्या तोंडावर शेकाप, सेनेला धक्कातंत्र

पालिका निवडणुकीच्या तोंडावर शेकाप, सेनेला धक्कातंत्र

Next

सांगोला : शेकापचे माजी नगरसेवक शिवाजी बनकर, शिवसेना माजी तालुकाप्रमुख मधुकर बनसोडे, विजय राऊत यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. सांगोला नगरपालिकेची निवडणूक केवळ चार महिन्यांवर येऊन ठेपली असताना या पक्षप्रवेशाने सेना आणि शेकापला धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे.

शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या बनकरवाडी, राऊतमळा, माळवाडी, फुलेनगर व पुजारवाडी परिसरात शेकाप पक्षाचे माजी नगरसेवक शिवाजी बनकर, विजय राऊत, माळी महासंघाचे राज्याचे कार्याध्यक्ष सोमनाथ राऊत, शिवसेना माजी तालुकाप्रमुख मधुकर बनसोडे, विद्यमान नगरसेविका रंजना बनसोडे, मेडशिंगी ग्रामपंचायतीचे सदस्य नितीन वसेकर, फुलाबाई बाबुराव वसेकर, ॲड. विक्रांत बनकर, ॲड. सोमनाथ नवले, इंजिनिअर किशोर गोडसे, संजय गार्डे यांच्यासह अनेकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

पालकमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या उपस्थितीत पुणे येथे हा पक्षप्रवेश केला. यावेळी आ. बबनदादा शिंदे, आ. संजय शिंदे, आ.यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, उत्तमराव जानकर, भगीरथ भालके, सुरेश पालवे, लतीफ तांबोळी, माजी नगरसेवक नाथा जाधव, गटनेते सोमनाथ लोखंडे, शहराध्यक्ष तानाजी पाटील उपस्थित होते.

बनकरवाडी, राऊतमळा, माळवाडी, फुलेनगर व पुजारवाडी या परिसरातून शेकापच्या उमेदवारांना नेहमीच विक्रमी मताधिक्य मिळत होते. याच बळावर शेकापने आजपर्यंत सांगोला शहराच्या राजकारणात वर्चस्व प्रस्थापित केले होते. आगामी नगरपालिका निवडणुकीत याचा प्रस्थापित शेकापला हा धक्का मानला जात आहे.

---

शेतकरी कामगार पक्षातून ज्या नेतेमंडळींनी आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे त्या विश्वासास कधीही तडा जाणार नाही. नगरपालिका निवडणुकीत ताकद दाखवून देऊ.

- दीपक साळुंखे-पाटील,माजी आमदार

---

गेल्या अनेक वर्षांपासून सांगोला शहर व तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाची प्रामाणिकपणे सेवा केली. पक्षनेतृत्वाने कधीही कामाची कदर केली नाही. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

- शिवाजी बनकर, माजी नगरसेवक

----

फोटो : १५ सांगोला १

शरद पवार आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत शेकापचे माजी नगरसेवक, शिवसनेचे माजी तालुकाप्रमुख यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी जयंत पाटील, दीपक साळुंखे-पाटील उपस्थित होते.

Web Title: In the face of municipal elections, Peshwa, a shock to the army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.