अर्ज स्वीकारण्यासाठी ३३ टेबलची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:20 AM2020-12-24T04:20:08+5:302020-12-24T04:20:08+5:30

संजीवन मुंढे म्हणाले, तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका सुरू आहेत़ त्यासाठी उपळाई रोडवरील शासकीय धान्य गोदामामध्ये उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी ...

Facility of 33 tables for accepting applications | अर्ज स्वीकारण्यासाठी ३३ टेबलची सोय

अर्ज स्वीकारण्यासाठी ३३ टेबलची सोय

Next

संजीवन मुंढे म्हणाले, तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका सुरू आहेत़ त्यासाठी उपळाई रोडवरील शासकीय धान्य गोदामामध्ये उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी ३३ निवडणूक निर्णय अधिकारी व प्रत्येकी दोन सहा़ निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती केली असून त्यासाठी ३३ टेबलावर अर्ज स्वीकारले जाणार आहेत़. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे़ पहिल्या दिवशी बुधवारी एकही अर्ज दाखल झाला नाही़. आज अर्ज दाखल करण्यासाठी कोणी फिरकले नसले तरी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तसेच कागदपत्रे जुळवाजुळव करण्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या धावपळी सुरू असल्याचे दिसून आले. काहीजण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून माहिती घेत होते़

जमा पावती पुस्तक घेऊन येतील ग्रामसेवक

३३ ग्रामसेवक हे सहा़ निवडणूक निर्णय अधिकारी असल्याने त्यांना याठिकाणी थांबावे लागत आहे़ त्यांच्याकडे गावचा कारभार देखील आहे़ त्यामुळे थकबाकी भरण्यासाठी ग्रामस्थ त्यांच्याकडे येत आहेत़ त्यामुळे त्यांना जमा पावती पुस्तक घेऊनच आता शासकीय गोडावूनमध्ये यावे लागणार आहे़

फोटो

२३बार्शी निवडणूक

ओळी

बार्शी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सदस्यांचे अर्ज स्वीकारण्यासाठी सज्ज असलेले अधिकारी व कर्मचारी.

Web Title: Facility of 33 tables for accepting applications

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.