योगाला जागतिक पातळीवर महत्त्व प्राप्त हेच भूषणावह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:21 AM2021-01-21T04:21:10+5:302021-01-21T04:21:10+5:30
मोहोळ : प्राचीन काळातील ऋषी परंपरेने दिलेली योगविद्या ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देेेणगी आहे. ओंंकाराचा जप, ...
मोहोळ : प्राचीन काळातील ऋषी परंपरेने दिलेली योगविद्या ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देेेणगी आहे. ओंंकाराचा जप, नमस्कार यामधून विविधांगी शारीरिक लाभ योग साधकाला होत असतो; परंतु सध्या योग म्हणण्यापेक्षा ‘योगा’ असा वेगळ्या पध्दतीने शब्द वापरला की आकर्षण वाढत आहे. काही का असेना पुनश्च एकदा योगाला भारतासह जागतिक पातळीवर महत्त्व प्राप्त झाले हे भूषणावह असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान दिल्ली येथील माजी अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत पांडव यांनी केले.
देशभक्त संभाजीराव गरड महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या प्राचीन भारतीय परंपरा, अध्यात्म व आरोग्य विषयावर डॉ. चंद्रकांत पांडव बोलत होते.
यावेळी डॉ. पांंडव यांनी जन्मदात्या आईचा महिमा सांगत 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असल्याचे म्हणाले.
याप्रसंगी देशभक्त स्व. संभाजीराव गरड बहुउद्देशीय व संशोधन संस्थेचे सचिव प्रतापसिंह गरड, वेदमूर्ती जोशी, डॉ. राज गरड , यमुना जाधव, नंदकुमार देशपांडे , राजेंद्र माने, नितेश गरड, उपप्राचार्य कुदळे, अधीक्षक आदिनाथ काळे , कार्तीक रेड्डी , विघ्नेश रेड्डी , पवनकुमार उपस्थित होते . आर. व्ही. माने, डॉ . अभिषेक बनाटे, डॉ. विक्रम पवार, उपस्थित होते.
---
फोटो : २० मोहोळ
योगाबद्दल मार्गदर्शन करताना डॉ. पांडव. यावेळी सचिव प्रतापसिंह गरड व मान्यवर