फडणवीस सोमवारी टेंभुर्णी, करमाळा दौºयावर; अतिवृष्टी भागाची पाहणी करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 02:37 PM2020-10-17T14:37:26+5:302020-10-17T14:39:10+5:30
शेतकºयांच्या भेटी घेणार; प्रशासनासोबत घेणार बैठक
सोलापूर : राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने, अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले असून, बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. या शेतकºयाला दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दि. १९ आॅक्टोबरपासून ३ दिवसांचा दौरा करणार आहेत.
१९ ला ते बारामतीपासून आपला दौरा प्रारंभ करतील. कुरकुंभ, इंदापूर, टेंभुर्णी, करमाळा, परंडा इत्यादी ठिकाणी दौरा करून ते उस्मानाबादकडे रवाना होतील. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या प्रवासानंतर दुसºया दिवशी, दि. २० रोजी उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी या जिल्ह्यातील ठिकाणांना ते भेटी देणार आहेत. तिसºया दिवशी दि. २१ रोजी हिंगोली, जालना, औरंगाबादचा ते दौरा करतील. या तीन दिवसांत ९ जिल्ह्यांमध्ये सुमारे ८५० कि.मी.चा प्रवास ते करणार आहेत.