कार्तिक एकादशीची शासकीय पूजा फडणवीस करणार; मंदिर समितीने दिले निमंत्रण

By Appasaheb.patil | Published: October 20, 2022 05:31 PM2022-10-20T17:31:23+5:302022-10-20T17:31:58+5:30

 शासकीय महापूजेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंदिर समितीकडून निमंत्रण

Fadnavis will perform official worship on Kartik Ekadashi; The invitation was given by the temple committee | कार्तिक एकादशीची शासकीय पूजा फडणवीस करणार; मंदिर समितीने दिले निमंत्रण

कार्तिक एकादशीची शासकीय पूजा फडणवीस करणार; मंदिर समितीने दिले निमंत्रण

Next

सोलापूर : कार्तिकी  शुध्द एकादशी निमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न होणार आहे.  शुक्रवार ४ नोव्हेंबर २०२२ रोजी  कार्तिकी  शुध्द एकादशी आहे.  गुरुवार २० ऑक्टोबर २०२२ रोजी मंत्रालय, मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांना शासकीय महापूजेसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने निमंत्रण देण्यात आले.

 मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह .भ .प गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते वारकरी पटका, वीणा व श्रीची मूर्ती भेट देऊन निमंत्रण देण्यात आले. यावेळी  आमदार बालाजी किणीकर, मंदिर समितीचे सदस्य शकुंतला नडगिरे, ह भ प ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ॲड. माधवी निगडे, ह. भ. प शिवाजीराव मोरे, ह .भ. प प्रकाश जवजाळ,  आचार्य तुषार भोसले,  मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी  संजीव जाधव, व्यवस्थापक  बालाजी पुदलवाड उपस्थित होते.

 

Web Title: Fadnavis will perform official worship on Kartik Ekadashi; The invitation was given by the temple committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.