हंजगीत रस्त्यासाठी प्रहारचा हलगी नाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:17 AM2020-12-09T04:17:43+5:302020-12-09T04:17:43+5:30
अक्कलकोट : तालुक्यात हंजगी - कर्जाळ व हंजगी - जेऊर या रस्त्याचे काम मंजूर असताना अनेक दिवसांपासून प्रलंबित राहिल्याने ...
अक्कलकोट : तालुक्यात हंजगी - कर्जाळ व हंजगी - जेऊर या रस्त्याचे काम मंजूर असताना अनेक दिवसांपासून प्रलंबित राहिल्याने मंगळवारी प्रहार संघटनेच्या वतीने हंजगी येथे हलगी नाद आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाची दखल घेत यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने काम सुरू करण्यासंदर्भात प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना लेखीपत्र देण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता थोंटे, शाखा अभियंता गायकवाड, सातपुते उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षांपासून हंजगी रस्ता खराब असल्याने तो नव्याने व्हावा म्हणून हंजगी ग्रामस्थांनी लोकसभा व विधानसभा निवडणूक पूर्वी मतदानावर बहिष्कार टाकला होता. याच मागणीसाठी मंगळवारी पुन्हा प्रहार संघटना व ग्रामस्थांनी हंजगी बसस्थानक येथे हलगीनाद आंदोलन करीत प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे तालुकाध्यक्ष नितीन माने, फातिमा बेग, स्वामिनाथ धनशेट्टी, मोहसिन मुल्ला, लक्ष्मण मस्के, हणमंत माने, यलप्पा कांबळे, गोपाळ मस्के, शिवाजी मस्के, रवींद्र कांबळे, पंकज मस्के, देवीदास सोनकांबळे, अभिषेक मस्के, सतीश माने, सागर मस्के, सैपन शेख, गणेश माने, अनिल माने, प्रशासकीय अधिकारी जमादार, ग्रामसेवक भीमराव गुरव, पोलीसपाटील मोहन वाघमोडे, अजय मस्के, मौलाली नदाफ उपस्थित होते.
--
फोटो : ०८ हंजगी
हंजगी येथे प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना लेखी पत्र देताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता थोटे, गायकवाड व सातपुते.