बनावट खते शेतकऱ्यांच्या माथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:22 AM2021-04-04T04:22:28+5:302021-04-04T04:22:28+5:30

यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. १९:१९:१९ या विद्राव्य खतांमध्ये युरिया भरडून त्यात लाल किंवा ...

Fake fertilizers on top of farmers | बनावट खते शेतकऱ्यांच्या माथी

बनावट खते शेतकऱ्यांच्या माथी

Next

यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा प्रकार सर्रास सुरू आहे.

१९:१९:१९ या विद्राव्य खतांमध्ये युरिया भरडून त्यात लाल किंवा गुलाबी रंग मिसळला जातो. त्याचे २५ किलोंचे पॅकिंग केले जाते. त्यासाठी अवघा १८० रुपये खर्च येतो. हेच २५ किलोंचे पॅकिंग १५०० रुपये दराने विकले जात आहे. याच पद्धतीने १२:६१:०० विद्राव्य खत बनवताना त्यात मॅग्नेशियम भरडून त्यामध्ये पोटॅश मिसळले जाते. अवघ्या ५५० रुपये खर्चाच्या या विद्राव्य खताची बाजारात १५०० ते २००० रुपये प्रति २५ किलो दराने विक्री करण्यात येत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

विविध संप्रेरके, कीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके अशा प्रकारची औषधेही कमी मात्रा वापरून बनवली जातात. ही औषधे अथवा विद्राव्य खते कमी रकमेत उत्पादित करून विक्री करण्याचे प्रमाण वाढले आहे. या उत्पादनासाठी कंपन्यांना कमी खर्च येतो. मात्र शेतकऱ्यांना त्याचा फारसा लाभ होत नाही . निकृष्ट दर्जाच्या उत्पादनाचे खत शेतकऱ्यांना विकण्याचे प्रमाण ग्रामीण भागातून वाढल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.

------

नफा अधिक शिवाय परदेशवारीची आमिषे

बनावट विद्राव्य खते आणि औषधे बनवून विकणाऱ्या अनेक कंपन्या दुकानदारांना घसघशीत नफा अथवा कमिशन देतात. काही कंपन्यांनी तर विक्रीचे ठरावीक लक्ष्य गाठल्यास परदेशवारी घडवून आणण्याचे आमिष दाखवतात. त्यामुळे दुकानदार याच उत्पादनांची खते, औषधे किती चांगली, त्यांचा रिझल्ट यावर भर देतात. शेतकऱ्यांच्या माथी ही उत्पादने मारण्याचे प्रकार वाढले आहेत. कमी किमतीत उत्पादन, मोठ्या प्रमाणात कमिशन देऊन त्यांची विक्री करणाऱ्या कंपन्या मालामाल होत असल्या तरी शेतकऱ्यांचे त्यातून नुकसान होत आहे.

-------

बनावट विद्राव्य खतांची विक्री ग्रामीण भागातील दुकानांतून अधिक केली जाते. द्राक्षांसाठी अशी खते वापरणे तोट्याचे ठरते. त्यामुळेच द्राक्ष उत्पादक संघाने विदेशी प्रमाणित खतांची विक्री सुरू केली आहे. दरवर्षी संघातून ३२०० मे टन खते विकली जातात.

- डॉ. चनगोंडा हाविनाळे, संचालक

द्राक्ष उत्पादक बागायतदार संघ, सोलापूर

-------

मागील वर्षी करमाळा येथे अशा प्रकारचे रॅकेट उघडकीस आले आहे. दुकानदारावर गुन्हा नोंदला आहे. शेतकऱ्यांनी प्रमाणित केलेलीच उत्पादने खरेदी करावीत, यासाठी आमचा आग्रह असतो.

-

- रवींद्र माने, जिल्हा अधीक्षक,

कृषी अधिकारी, सोलापूर.

----

तपासण्या नियमित व्हाव्यात.

शेतकरी अडाणी असतो. त्यांची फसगत होते. दुकानदार त्यांना विश्वासात घेऊन अशी बनावट खते औषधे माथी मारतात; पण गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांनी अचानक भेटी देऊन नियमितपणे दुकानांची झडती घेतली पाहिजे .

-

शरीफ शेख, द्राक्ष उत्पादक शेतकरी

कंदलगाव

-------

Web Title: Fake fertilizers on top of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.