सोन्या-चांदीच्या दर घसरणीमुळे दागिन्यातील गुंतवणूक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 02:52 PM2020-08-17T14:52:34+5:302020-08-17T14:55:01+5:30
चढ्या दरातही खरेदीत वाढ; जुन्या सोन्यावरील जीएसटीला विरोध
सोलापूर : अनेक दिवसांपासून सट्टा बाजारामुळे सुवर्ण बाजार अस्थिर झाला आहे़ परिणामत: सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होत आहे़ याचा सोलापूरकरांवर कसलाही परिणाम झालेला दिसून येत नाही़ जेव्हा दर वाढत गेले तेव्हा सोन्यातील गुंतवणुकीचे प्रमाण वाढत गेले़ याबरोबर आज सोन्याचा दर चार हजारांनी तर चांदीचा दर १२ हजारांनी उतरला असला तरी सोलापुरात मात्र गुंतवणुकीचा वेग कायम राहिला आहे.
चांदीत बुधवारी झालेल्या मोठ्या घसरणीनंतर गुरुवारी पुन्हा चार हजार रुपयांनी वाढ होऊन ती ६७,५०० रुपयांवर प्रतिकि लोवर पोहोचली आहे़ अशाच प्रकारे सोन्यातही १,७५० रुपयांनी वाढ होऊनही ते ५३,४५० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले आहे़ सट्टा बाजारात मोठी उलथापालथ होत असल्याने पुन्हा भाववाढ झाल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
मागील १५ दिवसात चांदीचा दर हा ७५ हजारांपर्यंत गेला होता़ आता ६७ हजारांवर स्थिरावला आहे़ सोन्याचा दर ५६ हजारांवरुन ५३ हजारांवर आला आहे़ तरीही हौशीवंतांची गुंतवणूक कायम राहिली आहे़ महिला दागिन्यात गुंतवणूक करताहेत तर पुरुष मंडळी बिस्कीटसह अनेक सोने प्रकारात गुंतवणूक करताहेत़ याही काळात बिल्वर, पाटल्या, राणीहार, तोडे खरेदी सुरू आहे.
‘जीएसटी’बाबत केरळ आग्रही!
दरम्यान, केरळात सर्वसामान्यांकडील जुन्या अर्थात तीन वर्षांच्या आतील दागिने विक्रीला काढल्यास ३ टक्के तर त्यापुढील कालावधीतील दागिने विक्रीला काढल्यास २०़८० टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या विचाराधीन असून केरळ सरकार याबाबत आग्रही दिसतेय़ आता यावर सराफ व्यावसायिकांमध्ये विरोध सुरू झाला आहे, असे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश देवरमनी यांनी सांगितले.
याहीकाळात दरातील चढ-उताराचा फायदा होतोय़ बँकांक डून ठेवींना व्याजदर कमी मिळतेय़ म्युच्युअल फंडातही गुंतवणूक करण्यास सर्वसामान्य घाबरताहेत़ जमीन खरेदीत रक्कम गुंतवली तर ती वाढीव रकमेला विकली जाईल की नाही याबाबत शाश्वती नाही़ उलट पोषक वातावरण आहे़ हा काळ सर्वसामान्यांना प्रोत्साहन देणारा आहे़ आता लग्न सराई खरेदी थांबली आहे आणि गुंतवणुकीकडचा कल वाढला आहे़
- मिलिंद वेणेगूरकर
सराफ व्यावसायिक