उन्हाळी फळांच्या भावात घसरण; शेतकरी करतायंत रस्त्यावर विक्री
By दिपक दुपारगुडे | Updated: March 18, 2023 17:13 IST2023-03-18T17:12:55+5:302023-03-18T17:13:19+5:30
सध्या फारसे खरेदीदार मिळत नाहीत म्हणून ग्रामीण भागातील टरबूज, खरबूज उत्पादक शेतकरी आपली फळे रस्त्यावरच विक्री करताना दिसत आहेत

उन्हाळी फळांच्या भावात घसरण; शेतकरी करतायंत रस्त्यावर विक्री
दीपक दुपारगुडे
सोलापूर : प्रत्येक ऋतुत वेगवेगळी फळे बाजारात विक्रीसाठी येतात. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने मनुष्याच्या शरीरातील कमी झालेल्या पाण्याचे प्रमाण भरुन काढणारी फळे येथील बाजारात विक्रीस आली आहेत. यात प्रामुख्याने टरबूज, खरबूज यांचा समावेश आहे. उन्हाळ्याची सुरुवात होताच बाजारपेठेत गत काही दिवसांपासून बाजारात टरबूज, खरबूज, अननस आणि द्राक्ष आवक वाढली आहे.
सध्या फारसे खरेदीदार मिळत नाहीत म्हणून ग्रामीण भागातील टरबूज, खरबूज उत्पादक शेतकरी आपली फळे रस्त्यावरच विक्री करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे अन्य फळांपेक्षा या फळांची किंमत कमी असल्याने गरीबांपासून श्रीमंत पर्यंत ही फळे खरेदी करतांना दिसून येत आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत ऊन आणि उष्ण वाऱ्यामुळे शरीरावर परिणाम होत असतो. उन्हाळ्यात पोटातील दाह वाढतो. हा दाह शमविण्यासाठी उन्हाळी फळे लाभदायी ठरतात. हंगामी फळे हा उत्तम उपाय आहे. दरम्यान, टरबूज, खरबूज या उन्हाळी फळासोबतच शरीराला बल्लम काकडी, बीट आदीची आवक होत आहे. मात्र मागणीपेक्षा पुरवठा अधिक असल्यामुळे गत काही दिवसांपासून फळांच्या भावात घसरण झाली आहे.
याठिकाणी रस्त्यावर विक्री
यामध्ये एसटी स्टॅन्ड, सातरस्ता, वैजापूर रॉड, आसरा चौक, महावीर चौक, रंगभवन, आसरा ब्रिज, मन चौक, नई जिंदगी येथे जागा मिळेल तिथे रस्त्याच्या कडेला आपली दुकान थाटून या फळाची विक्री करीत आहे.