फसलेल्या भक्तांनो, न घाबरता पुढे या, तक्रारी द्या..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:25 AM2021-09-22T04:25:58+5:302021-09-22T04:25:58+5:30

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मंगळवारी (ता. २१) करमाळा पोलीस स्टेशनला भेट दिली. त्यांनी पत्रकारांशी सवांद साधला. यावेळी ...

Fallen devotees, come forward without fear, complain ..! | फसलेल्या भक्तांनो, न घाबरता पुढे या, तक्रारी द्या..!

फसलेल्या भक्तांनो, न घाबरता पुढे या, तक्रारी द्या..!

Next

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मंगळवारी (ता. २१) करमाळा पोलीस स्टेशनला भेट दिली. त्यांनी पत्रकारांशी सवांद साधला. यावेळी पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे उपस्थित होते. पोलीस अधीक्षक सातपुते म्हणाल्या, मनोहर भोसले प्रकरणात संशयित आरोपीला २७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी आहे. त्यात पोलिसांचा तपास सुरू आहे. यामध्ये आणखी दोन गुन्हेगारांना अटक करायची आहे. एक संशयित आरोपी ओंकार शिंदे बारामती पोलिसांच्या ताब्यात आहे. या प्रकरणात पोलिसांनी गांभीर्य ओळखून खूप संवेदनशील कलमे वापरलेली आहेत. तपासात काही जबाब घेतले जाणार आहेत. त्यातून जे समोर येईल, त्यानुसार कायदेशीर कारवाई होईल. पुढे पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, आमच्याकडे तक्रार आल्याबरोबर सोलापूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करून अर्जंट करमाळ्यात दाखल केली होती. दरम्यानच्या काळात जे संशयित आरोपी आहेत, त्यापैकी एकाला बारामती पोलिसांनी अटक केली आहे. कोणत्याही नागरिकांवर त्या बाबाकडून अन्याय, अत्याचार झालेला असेल, तर तक्रार देण्यासाठी त्यांनी पुढे यावे.

..........

कायद्यापुढे सर्व समान

मनोहरमामा प्रकरणात करमाळा येथे दोन तक्रारी प्राप्त आहेत. त्यातील एकाला नोटीस दिलेली आहे. दुसऱ्या तक्रारीत प्राथमिक चौकशी सुरू आहे. त्यात काही तथ्य आढळले तर पुढील प्रक्रिया केली जाईल. कायद्यापुढे सर्व समान आहेत, असेही पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.

.......

फोटो : तेजस्वी सातपुते

Web Title: Fallen devotees, come forward without fear, complain ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.