नव्या तुरीची आवक झाल्याने दरात घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:21 AM2020-12-22T04:21:44+5:302020-12-22T04:21:44+5:30
बार्शी व परिसरात मोठ्या प्रमाणात खरीप हंगामातील तुुरीचे उत्पादन घेतले जाते़ गेल्या आठ ते दहा दिवसांपासून तुरीची आवक ...
बार्शी व परिसरात मोठ्या प्रमाणात खरीप हंगामातील तुुरीचे उत्पादन घेतले जाते़ गेल्या आठ ते दहा दिवसांपासून तुरीची आवक ही वाढू लागली आहे़ सोमवारी १० हजार कट्टे आवक होती़ गेल्या आठवड्यात तुरीला ५ हजार ७०० ते ६ हजार १०० रुपये क्विंटल दर मिळत होता़ मात्र गेल्या तीन-चार दिवसात तुरीचे दर हे कमी होऊन आता ५,००० ते ५,५०० पर्यंत खाली आले आहेत़ आवक वाढल्यानंतर पुन्हा दर खाली येण्याचा धोका आहे़ त्यामुळे शासनाने शेतक-यांकडे माल आहे, काढणी सुरू आहे तोपर्यंत हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे.
हमीभावापेक्षा कमी दर
शासनाचा तुरीचा हमीभाव हा ६ हजार १०० क्विंटल आहे तर बाजारात हमीभावापेक्षा ५०० ते १,१०० रुपये कमी भावाने शेतक-याला तूर विक्री करावी लागत आहे़ मुळात यंदा अतिवृष्टीमुळे तुरीचे पीक पाणी लागल्याने वाया गेले आहे़ त्यामुळे उत्पादनात ५० टक्क्यांनी घट झाली आहे. म्हणजे एकीकडे उत्पादन नाही आणि दुसरीकडे भाव ही नाही अशा दुहेरी कात्रीत शेतकरी अडकला आहे़ त्यामुळे वेळ गेल्यावर नव्हे तर आताचा हमीभाव केंद्रे सुरू करावी, अशी मागणी शेतकरी हर्षवर्धन बोधले यांनी केली आहे़
फोटो
२१बार्शी-मार्केट यार्ड
ओळी
बार्शी बाजार समितीत आडते संतोष लोंढे यांच्याकडून तूर खरेदी करताना खरेदीदार सचिन मडके.