खोटा धनादेश; एक जण निर्दोष

By admin | Published: February 3, 2015 05:36 PM2015-02-03T17:36:49+5:302015-02-03T17:36:49+5:30

खोटा धनादेश देऊन फसवणूक केल्याप्रकरणी समीर देशमुख याची अतिरिक्त सत्र न्यायाधीश त्रिपाटी यांनी निर्दोष मुक्तता केली.

False checks; One person innocent | खोटा धनादेश; एक जण निर्दोष

खोटा धनादेश; एक जण निर्दोष

Next

सोलापूर : खोटा धनादेश देऊन फसवणूक केल्याप्रकरणी समीर देशमुख याची अतिरिक्त सत्र न्यायाधीश त्रिपाटी यांनी निर्दोष मुक्तता केली. 
समीर देशमुख याने दत्ता कांबळे याच्याकडून कौटुंबिक अडचणीसाठी ५0 हजार रुपये घेतले होते. परतफेड म्हणून समीरने कांबळे यांना ५0 हजाराचा धनादेश दिला होता. तो धनादेश कांबळे यांनी आपल्या बँक खात्यात भरला असता तो वठला नाही. न वठणारा धनादेश देऊन आपली फसवणूक झाली म्हणून कांबळे यांनी न्यायालयात खासगी फिर्याद दिली होती. दत्ता कांबळे यांनी बेकायदेशीररित्या सावकारीचा व्यवसाय करतो. बेकायदेशीर व्यवहार करून लोकांकडून जास्त पैसे उकळतो, असा बचाव आरोपी देशमुख याने केला. 
आरोपीच्या वतीने अँड. प्रदीपसिंग राजपूत यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने समीर देशमुख याची निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे अँड. प्रदीपसिंग राजपूत यांनी तर फिर्यादीच्या वतीने अँड. ए. डी. कुलकर्णी यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)

Web Title: False checks; One person innocent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.