डायल ११२ वर दिली खोटी माहिती; फोन करणाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल

By संताजी शिंदे | Published: April 28, 2024 08:25 PM2024-04-28T20:25:44+5:302024-04-28T20:26:02+5:30

संबंधित व्यक्ती विरूद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

False information given on Dial 112; A case has been registered against the caller | डायल ११२ वर दिली खोटी माहिती; फोन करणाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल

डायल ११२ वर दिली खोटी माहिती; फोन करणाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल

सोलापूर : नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ वर फोन करून खुन झाल्याची माहिती दिली. प्रत्यक्ष पोलिसांनी सांगितलेल्या घटनास्थळी जाऊन पहाणी केली असता, असा काही प्रकार घडला नसल्याचे समजले. त्यामुळे पोलिसांनी खोटी माहिती दिली म्हणून संबंधित व्यक्ती विरूद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

अधिक माहिती अशी की, सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात हवालदार गणेश लोखंडे हे शनिवारी डायल ११२ वर ड्युटीला होते. दरम्यान त्यांना एम.डी.टी. चॅनल नंबर १ वर १२.०२ वाजण्याच्या सुमारास एका मोबाईल नंबरवरून अज्ञात व्यक्तीचा फोन आला. फोन वरील व्यक्तीने बोरामणी (ता.दक्षिण सोलापूर) येथे व्हॉलीबॉल मैदानाच्या ठिकाणी १८ वर्षीय मुलीला तिच्या नवऱ्याने अर्ध्या तासापुर्वी मारहाण करून कुऱ्हाडीने खुन केला आहे, अशी माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार हवालदार गणेश लोखंडे यांनी पुन्हा फोन आलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क केला, मात्र संबंधित व्यक्तीने उचलला नाही.

त्यामुळे हवालदार लोखंडे हे आलेल्या फोनची खातरजमा करण्यासाठी बोरामणी गावचे पोलिस पाटील व पोलिस अंमलदार तांबे यांच्यासह घटनास्थळी गेले. तेथे जाऊन माहिती घेतली असता असा कोणताही प्रकार या ठिकाणी घडला नसल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. डायल ११२ वर खोटी माहिती दिली म्हणून हवालदार गणेश लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय दंड संहिता कलम १८२ प्रमाणे संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चुकीची माहिती दिल्यास कारवाई : देवळेकर
० डायल ११२ हा लोकांच्या मदतीसाठी उपलब्ध करण्यात आलेला नंबर आहे. खरच काही अडचण असेल तर लोकांनी याचा जरूर लाभ घ्यावा. विनाकारण फोन करून चुकीची माहिती देऊ नये, हा फोन थेट मुंबई कार्यालयाला जात असतो. दिलेली माहिती चुकीची निघाल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर यांनी दिली.
 

Web Title: False information given on Dial 112; A case has been registered against the caller

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.