शेतवस्तीला आग, संसारपयोगी साहित्य खाक

By दिपक दुपारगुडे | Published: December 31, 2023 07:06 PM2023-12-31T19:06:13+5:302023-12-31T19:06:24+5:30

सोलापूर : नागणसूर (ता. अक्कलकोट) येथील एका शेत वस्तीला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे शेती, संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.  ...

Farm burned, household materials destroyed | शेतवस्तीला आग, संसारपयोगी साहित्य खाक

शेतवस्तीला आग, संसारपयोगी साहित्य खाक

सोलापूर: नागणसूर (ता. अक्कलकोट) येथील एका शेत वस्तीला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे शेती, संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. 
याबाबत एका संशयित व्यक्तीविरुद्ध दक्षिण पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, तक्रारदार आणप्पा गुरुसिद्धप्पा लददे यांची नाविदगी रस्त्यावर शेतजमीन आहे. त्या ठिकाणी शेतवस्ती आहे. २८ डिसेंबर रोजी रात्री १० ते २९ डिसेंबर पहाटे ७ वाजेपूर्वी लागलेल्या आगीत  १ क्विंटल गहू, १ क्विंटल ज्वारी, कपडे, संसार उपयोगी साहित्य तसेच ३५ पाइप वीस फुटी, ३०० फूट केबल वायर, ३ ताडपत्री, पत्रे २३ असे शेती व संसारोपयोगी लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. तर ५० हजार रुपये किमतीची एक म्हैस मात्र काही प्रमाणात जळाली आहे. घटनेच्या दिवशी एका व्यक्ती बरोबर तक्रार होऊन वादविवाद झाले होते. त्यांनीच हे कृत्य केले असावे, अशा प्रकारचा तक्रार अर्ज रविवारी पोलिसाकडे दाखल करण्यात आला.

Web Title: Farm burned, household materials destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.